नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रँचायझींनी दुर्लक्ष केल्यानंतर भारतीय कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज हनुमा विहारी इंग्लंडमध्ये सहा कसोटी सामन्यांच्या आगामी दौऱ्याच्या तयारीसाठी कौंटी संघ वार्विकशायरसोबत जुळणार आहे. इंडियन प्रीमियर लीगनंतर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. संघाला त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी व्हायचे आहे.विहारी इंग्लंडमध्ये दाखल झाला असून बर्मिंघममध्ये या कौंटी संघासोबत या मोसमात किमान तीन सामन्यांसाठी जुळणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले,‘होय, विहारी यंदाच्या मोसमात इंग्लंडचा कौंटी संघ वार्विकशायरतर्फे खेळेल. तो काही सामने खेळले. तो इंग्लंडमध्येच आहे.’ दरम्यान, वार्विकशायर कौंटीमध्ये याची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, पण बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या मते यात करारबाबत जुळलेल्या मुद्यावर काम सुरू आहे. तो किमान तीन सामने खेळले. त्याला आणखी काही सामने खेळण्याची संधी मिळू शकते का, याबाबत माहिती घेत आहोत.’ विहारीने यापूर्वी २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले होते, पण त्यानंतर त्याच्यावर कसोटी स्पेशालिस्टचा शिक्का लागल्यामुळे आयपीएल लिलावामध्ये त्याच्यावर कुठल्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. या २७ वर्षीय फलंदाजाने भारतातर्फे १२ कसोटीमध्ये ३२ पेक्षा अधिक सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. त्याने या कालावधीत एक शतक व चार अर्धशतके ठोकली आहेत.तो भारतातर्फे शेवटच्या वेळी सिडनी कसोटीत खेळला होता. स्नायूच्या दुखापतीने त्रस्त असताना त्याने चार तास संघर्षपूर्ण खेळी करीत नाबाद १२३ धावा करीत अश्विनसोबत कसोटी सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- हनुमा विहारी खेळणार वार्विकशायर संघाकडून
हनुमा विहारी खेळणार वार्विकशायर संघाकडून
विहारी इंग्लंडमध्ये दाखल झाला असून बर्मिंघममध्ये या कौंटी संघासोबत या मोसमात किमान तीन सामन्यांमध्ये खेळणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 4:26 AM