ICC World Cup 2019, मँचेस्टर : क्रिकेट विश्वात आतापर्यंत एक गोष्ट कधीही घडली नव्हती. ती गोष्ट आज घडली. कारण क्रिकेट विश्वात ही गोष्ट फक्त आजच घडलेली पाहायला मिळाली. आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषकाच्या सामन्यात ही गोष्ट घडली.
क्रिकेट विश्वातील एक मोठा विक्रम इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने आपल्या नावावर केला आहे. आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुरु आहे. या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत मॉर्गनने तब्बल 148 धावा फटकावल्या. या फटकेबाजीबरोबर त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
आतापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये 17 षटकार कोणत्याही एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाले नव्हते. पण आज ही गोष्ट मॉर्गनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. यापूर्वी 16 षटकारांचा विक्रम विश्वचषकामध्ये ख्रिस गेलच्या नावावर होता. हा विक्रम मॉर्गनने मोडीत काढला आहे.
Web Title: This happened for the first time in cricket world; 'THIS' player has been set in the World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.