महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो यानं त्याच्यासाठी चक्क गाणंच तयार केलं. पण, यात आता सर्वात चर्चिली जात आहे, ती पत्नी साक्षीनं दिलेल्या शुभेच्छा... सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असलेल्या साक्षीनं पतीला रोमँटिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिनं बर्थ डे सेलिब्रेशनचा प्लानही सांगितला.
महेंद्रसिंग धोनी जुलै 2019पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत असल्या तरी धोनी टीम इंडियात पुनरागमन करेल, असा अनेकांना विश्वासही आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधून ( आयपीएल) धोनीच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवरही अनिश्चिततेचं सावट आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात धोनी त्याच्या कुटुंबीयांसोबत रांची येथील फार्म हाऊसवर वेळ घालवत आहे. साक्षी सोशल मीडियावर धोनी आणि मुलगी जीवा यांची धम्माल मस्ती सतत पोस्ट करत असते.
धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साक्षीनं पोस्ट लिहिली की,''तुझ्या वाढदिवसाची तारीख मार्क करून ठेवली आहे. आणखी वर्ष... माझ्याकडून गोड शुभेच्छा आणि गिफ्ट. केक कापून आणि कँडल पेटवून तुझा वाढदिवस साजरा करूया. वाढदिवसाच्या शुभेच्छा!''
माही, तो 'टफ कॉल' घ्यायची हीच ती वेळ, कारण...
काश्मीर खोऱ्यात पहारा देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे Unseen Photo व्हायरल!
महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!
समुद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहिलं की कायम तुझी आठवण येते; केदार जाधवंच भावनिक पत्र