मुंबई - टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांचा आज 69 वा जन्मदिवस आहे. 10 जुलै 1949 साली मुंबईत जन्मलेल्या सुनिल गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटविश्वात त्यांचे नाव अजरामर केले आहे. मात्र, सुनिल यांनी एका मराठी चित्रपटातही काम केले आहे. सन 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सावली प्रेमाची' या मराठी सिनेमातून सुनिल गावस्कर यांनी अभिनय क्षेत्रात एंट्री केली होती. तर, 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या नसरुद्दीन शाह यांच्या 'मालामाल' या चित्रपटातही पाहुणा कलाकार म्हणून सुनिल यांनी काम केले आहे.
भारतीय संघाचे 1980 ते 90 च्या दशकातील प्रभावी फलंदाज सुनिल गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटमध्ये एक दशक गाजवले. भारताला 1983 साली विश्वचषक जिंकून देण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. सुनिल गावस्कर यांनी भारतीय संघासाठी 233 आंतरराष्ट्रीय सामन्यात 13,214 धावा केल्या आहेत. लहानपणापासूनच सुनिल गावस्कर यांना क्रिकेटचा छंद होता. शाळेत असताना 1966 साली 246 धावांची तुफानी खेळी केली होती. त्यामुळे त्यांना भारताच बेस्ट स्कूलबॉय क्रिकेटर ऑफ द इयर असेही म्हटले जाते. सुनिल गावस्कर यांना लिटल मास्टरही म्हटले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार करणारे सुनिल गावस्कर हे पहिले खेळाडू आहेत. तर सलग 100 कसोटी सामने खेळण्याचा पहिला मानही त्यांनाच मिळाला आहे.
सुनिल यांनी 1980 साली प्रेमाची सावली या चित्रपटात अभिनय केला होता. तर त्यांनी एक मराठी गाणेही गायले आहे. 'या दुनियामध्ये थांबायला वेळ कोणाला' असे या गाण्याचे बोल होते. सुनिल गावस्कर यांनी नी मल्होत्रा (मार्शनील गावस्कर) हिच्याशी लग्न केले. नी या कानूपरमधील लेथर इंडस्ट्रीयालीस्टची कन्या आहेत. सुनिल हे स्वत: उत्कृष्ट क्रिकेटर असतानाही, ते वेस्ट इंडिजचे क्रिकेटर रोहन कन्हाई यांचे मोठे चाहते होते. त्यामुळे सुनिल यांनी त्यांच्या मुलाचे नाव रोहन असे ठेवले. रोहननेही क्रिकेटमध्ये नशिब आजमविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यास यश आले नाही.