मुंबई - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 37 वा वाढदिवस आहे. धोनीने आपल्या तुफानी खेळीच्या जोरावर जगभरातील दिग्गजांनाही आपले चाहते बनवले. त्यामध्ये पाकिस्तानचे माजी जनरल परेवज मुशर्रफ यांचाही समावेश आहे. मुशर्रफ यांनी 2006 च्या पाकिस्तान दौऱ्यावेळी धोनीच्या खेळीचे कौतूक करताना त्याची हेअरस्टाईलही मस्त असल्याचे म्हटले होते.
7 जुलै 1981 साली एका सर्वसाधारण कुटुंबात धोनीचा जन्म झाला होता. शालेय जीवनापासूनच धोनीला क्रिकेटचे वेड लागले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलक्रिस्टला आदर्श मानणाऱ्या धोनीने टीम इंडियासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले. सन 2000 साली खड्गपूरच्या रेल्वे स्थानकावर टिकीट कलेक्टरची नोकरी करणाऱ्या या तरुणाने प्रतिकूल परिस्थीतीवर मात करत अखेर टीम इंडियात स्थान मिळवले.
कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडिया 2006 साली पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. आपल्या या संधीचे सोने करत धोनीने पाकिस्तान दौऱ्यातूनच मॅच फिनिशर असल्याचे दाखवून दिले. लाहोर येथील सामन्यात धोनीच्या खेळीमुळे भारताला विजय मिळाला होता. त्यावेळी परवेश मुशर्रफ यांनी धोनीच्या खेळाचे कौतूक केले. तसेच धोनीची हेअरस्टाईलही मस्त असून धोनीने केसं कापू नयेत, असा सल्लाही मुशर्रफ यांनी धोनीला दिला होता. धोनीच्या जीवनावर आधारित एमएस.धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातही हा सीन दाखविण्यात आला आहे. मात्र, 2007 चा विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने आपले केसं कापले. दरम्यान, केवळ भारतातच नाही तर जगभरात धोनीचे चाहते असून आज जगभरातून धोनीला शुभेच्छा मिळत आहेत.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरकडूनही शुभेच्छा...