मुंबई- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे जीवन नक्कीच एका चित्रपटाला शोभेल असेच आहे. त्यामुळेच नीरज पांडे दिग्दर्शित 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' हा धोनीचा चरित्रपट चाहत्यांना भावला. धोनीच्या जीवनात घडलेल्या अनेक रंजक आणि शॉकिंग घटना आपण या चित्रपटाच्या माध्यमातून पाहिल्या आहेत. तरिही धोनीबद्दलच्या या 7 रंजक गोष्टी तुम्हाला म्हणजेच धोनीच्या चाहत्यांना माहिती असायलाच हव्यात.
हेलिकॉप्टर शॉटचा मास्टर आणि मॅच फिनीशर धोनीने क्रिकेट विश्वात कित्येक रेकॉर्ड बनवले. तर शुक्रवारी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील 500 वा सामना खेळण्याचा मानही धोनीने मिळवला. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या मनात माहीने मिळवलेले स्थान हे त्याच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. मात्र, यांसह धोनीच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला जाणून घेता येतील.
* धोनीच्या जीवनातील 7 रंजक गोष्टी
1 - भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलचा बहुमान मिळालेला कपिल देवनंतर धोनी हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. 1 नोव्हेंबर 2011 रोजी धोनीला हा सन्मान मिळाला. 2 - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमपासून प्रेरणा घेत धोनीने क्रिकेट करिअरच्या सुरुवातीला आपले केसं लांब ठेवले होते. 3 - रांचीमधील राष्ट्रीय महामार्ग 33 येथे असलेल्या देवरी मंदिराला धोनी वारंवार भेट देतो. या मंदिरातील देवीवर धोनीची श्रद्धा आहे. 4 - कोट्यवधी फॅन असलेला धोनी हाही गायक किशोर कुमार यांचा चाहता आहे. जुन्या हिंदी चित्रपटातील किशोर कुमार यांची गाणी धोनीला खूप आवडतात. 5 - जगभरातील महान खेळाडू असलेला धोनी WWE या खेळावर प्रचंड प्रेम करतो. त्यामुळेच धोनीने द ग्रेट ब्रेट हीटमॅन हार्ट आणि हल्क होगान यांचे कौतूक केले आहे.6 - माही 2007 मध्ये पहिल्यांदाच कोलकाता येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्नी साक्षीला भेटला. तेथूनच धोनीच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. 7 - क्रिकेटसोबतच धोनीचे फुटबॉल प्रेम सर्वांनाच माहित आहे. मात्र, बॅडमिंटन खेळाचाही धोनी मोठा चाहता आहे. धोनीच्या जीवनावरील चित्रपटातही धोनी बॅडमिंटन खेळतानाचा सीन दाखविण्यात आला आहे.
टीम इंडियाच्या अशा या जगजेत्या कर्णधारास 37 व्या जन्मदिनाच्या त्याच्या धावांच्या रेकॉर्डएवढ्या शुभेच्छा.
आयसीसीकडूनही धोनीला शुभेच्छा...