Video: 'वीरू'चा नादच खुळा; सचिन तेंडुलकरसाठी थेट शीर्षासनच केलं! म्हणाला...

सचिनच्या ५०व्या वाढदिवसाच्या वीरेंद्र सेहवागकडून 'हटके' शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 10:01 AM2023-04-24T10:01:08+5:302023-04-24T10:03:48+5:30

whatsapp join usJoin us
Happy Birthday Sachin Tendulkar Virender Sehwag wishes Master Blaster in a Unique Way post Video upside down watch Video | Video: 'वीरू'चा नादच खुळा; सचिन तेंडुलकरसाठी थेट शीर्षासनच केलं! म्हणाला...

Video: 'वीरू'चा नादच खुळा; सचिन तेंडुलकरसाठी थेट शीर्षासनच केलं! म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Happy Birthday Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर, जागतिक क्रिकेटमधला महान फलंदाज आणि भारतीयांचे दैवत अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकरने आज आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले. आपल्या सर्वांचा लाडका सचिन आज ५० वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतली. या गोष्टीलाही आता दहा वर्ष होत आली. पण तरीही त्याने त्याची प्रतिमा आणि चाहतावर्ग अद्यापही तसाच राखण्यात यश मिळवले आहे. निवृत्तीनंतर त्याचा चाहतावर्ग कमी झालेला नाहीच, उलट सचिनच्या नवनव्या गोष्टींमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये भरच पडताना दिसते. क्रिकेटमध्ये ४०व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सचिनने २४ वर्षे क्रिकेट खेळले आणि समृद्ध अशी कारकीर्द घडवली. सचिनचे रेकॉर्ड पाहिले की प्रत्येक भारतीय सचिनला साष्टांग दंडवत घालूनच त्याचे आभार मानू शकतो. मात्र सचिनचा सहकारी माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने यापुढे एक पाऊल जात थेट शीर्षासन करत सचिनला शुभेच्छा दिल्यात.

सचिन तेंडुलकरसाठी थेट शीर्षासनच केलं!

वीरेंद्र सेहवाग मैदानावर आपल्या तडाखेबाज बॅटिंगसाठी ओळखला जायचा. निवृत्तीनंतर सोशल मीडिया आणि कॉमेंटरी बॉक्समध्ये तो त्याच्या विनोदबुद्धीसाठी चांगलाच चर्चेत असतो. एखाद्या चर्चेत असलेल्या विषयावर तो अतिशय चपखलपणे आणि तितकेच विनोदी अंगाने भाष्य करतो. त्याच्या सोशल मीडियावर अनेकदा लोक त्याची स्तुती करताना दिसतात. आज विरूचे दैवत असलेल्या सचिनचा ५०वा वाढदिवस असल्याने सेहवागने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. विरू ने शीर्षासन करून सचिनला शुभेच्छा दिल्यात. तो म्हणाला- "सचिन पाजी, मैदानात तुम्ही जे बोललात त्याच्या उलटंच केलं आहे. त्यामुळे तुमच्या ५०व्या वाढदिवशी तुम्हाला उलटं होऊन शीर्षासनात शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सदिच्छा व्यक्त करतो की तुमचं जीवन सदैव सरळ चालत राहो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो."

दरम्यान, भारताचा लाडका असलेल्या सचिनवर काल रात्री बारा वाजल्यापासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन स्वत: आपला ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच कोकणात गेला आहे. सचिन आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात असून तो आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी साजरा करत आहे. सचिन रविवारी दुपारी मित्रांसमवेत गोवा मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला. तेथील भोगवे समुद्रकिनारी फेरफटका मारताना तो अनेकांना दिसला. भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन आपला ५०वा वाढदिवस साजरा करणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Happy Birthday Sachin Tendulkar Virender Sehwag wishes Master Blaster in a Unique Way post Video upside down watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.