मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा आज 46 वा वाढदिवस... 2013 साली वानखेडेवर तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, परंतु त्याच्या खेळाची मोहिनी अजूनही क्रिकेटप्रेमींच्या मनावर कायम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकावणाऱ्या पहिल्या आणि एकमेव खेळाडूचा मान तेंडुलकरच्या नावावर आहे. भारतीय क्रिकेटसाठी त्याने दिलेले योगदान हे अमुल्य आहे. पण, तुम्हाला हे माहीतीय का, तेंडुलकरने पाकिस्तान संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.
तेंडुलकरने 463 वन डे सामन्यात 86.23 च्या स्ट्राइक रेटने 18426 धावा केल्या आहेत. यात 49 शतकांचा, तर 96 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत 200 सामन्यांत त्याने 51 शतक व 68 अर्धशतकांसह 15921 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 2000 हून अधिक चौकार मारणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याच्या नावावर 2058 चौकार आहेत.