Join us  

Happy Birthday : कॅन्सरशी लढून परतल्यावर पत्नी हेझलने युवराजचे नावंच बदलले होते, पण का...

दणदणीत खेळीनंतर युवराजचे चाहते भलतेच खूश झाले होते. कारण त्यांना पुन्हा एकदा आपला जुना युवरा पुन्हा एकदा मैदानात भेटला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 3:16 PM

Open in App
ठळक मुद्देयुवराज कॅन्सरनंतर जेव्हा मैदानात परतला तेव्हा इंग्लंडचा संघ त्याच्या समोर होता.

मुंबई : युवराज सिंगने भारताला बरेच सामने जिंकवून दिले. २०११च्या विश्वविजयात तर युवराजने सिंहाचा वाटा उचलला होता. पण या विश्वचषकानंतर युवराजला कॅन्सर झाला. युवराज कॅन्सरमधून वाचणार की नाही, याबाबत चाहत्यांना चिंता होती. पण युवराज फक्त कॅन्सरमधून फक्त बराच झाला नाही तर तो मैदानात उतरला. कॅन्सरमधून युवराज बरा झाल्यावर त्याचे नावंच पत्नी हेझल कीचने बदलले होते. पण हेझलने असे का केले होते, याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

युवराज कॅन्सरनंतर जेव्हा मैदानात परतला तेव्हा इंग्लंडचा संघ त्याच्या समोर होता. हा सामना कटक येथे १९ जानेवारी २०१७ साली खेळला गेला होता. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. या सामन्यात युवराजने १२७ चेंडूंत २१ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर १५० धावांची धडाकेबाज खेळी साकारली  होती. यावेळी युवराजला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.

या दणदणीत खेळीनंतर युवराजचे चाहते भलतेच खूश झाले होते. कारण त्यांना पुन्हा एकदा आपला जुना युवरा पुन्हा एकदा मैदानात भेटला होता. या खेळीनंतर हेझलने एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये युवराजने नाव हे 'विस्फोटक' ठेवायला हवे, असे म्हटले होते.

युवराजची फिल्मी स्टाईल Love Story!सिक्सर किंग युवराज सिंग मैदानाबरोबर ग्लॅमरच्या दुनियेतही चांगलाच प्रसिद्ध होता. युवराज बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्येही चांगलाच रमलेला पाहायला मिळतो. युवराजची पत्नी हेझल किच ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायची.

युवराज आणि हेझल यांची भेट एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर युवराजने हेझलला कॉफी पिण्यासाठी आमंत्रण दिले होते. हेझल जेव्हा कॉफी प्यायला येत होती तेव्हा तिने आपला फोन बंद केला होता. हेझलची ही सवय पाहून युवराजने तिचा नंबर डिलीट केला होता.

युवराज आणि हेझल यांच्या फेसबूकमध्ये एक मुलगा कॉमन मित्र होता. युवराजने हेझलला त्याच्यापासून लांब राहायला सांगितले होते. युवराजला हेझलवर प्रेम जडले होते. युवराजने हेझलला प्रपोज केले. पण हेझलने युवराजला उत्तर द्यायला तीन वर्षे लावली.

युवराजला होकार दिल्यानंतर हेझल एक वर्ष त्याला भेटली नव्हती. युवराजला बऱ्याच मुली भेटतात, त्याच्या जवळ येतात. पण युवराज त्यांच्याशी कसा वागतो, हे मी नेहमीच पाहत असते, असे हेझल म्हणते. युवराजने जेव्हा मला लग्नासाठी प्रपोज केलं होतं, तेव्हा मी त्याबाबत गंभीर नव्हते, असेही हेझल म्हणाली होती.

युवराज आणि हेझल यांचे अखेर लग्न झाले. आज युवराजचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याची ही लव्ह स्टोरी पुढे आली आहे.

टॅग्स :युवराज सिंग