नवी दिल्ली : भारतीय संघाबरोबरच त्यांच्या चाहत्यांसाठी एक खूष खबर आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे आता तो रणजी करंडक स्पर्धेत बडोद्याच्या संघाडकून खेळणार आहे.
हार्दिकने फिटनेस कमावण्यासाठी केला हा व्यायाम, पाहा व्हिडीओ
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांना हार्दिकची उणीव भासत आहे. त्यामुळे फिट झाल्यावर आता हार्दिक नेमका कधी भारतीय संघात दाखल होतो, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असेल.
दुबईमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच हार्दिकला दुखापत झाली होती. त्यानंतर आतापर्यंत हार्दिक कोणत्याही सामन्यात खेळला नव्हता. त्यानंतर आता तो रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उतरणार आहे. बडोद्याचा हा सामना 14 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
बडोद्याचा संघ पुढील प्रमाणे : केदार देवधर (कर्णधार), आदित्य वाघमोडे, विष्णु सोलंकी, यूसुफ पठान, स्वप्निल सिंह, भार्गव भट्ट, सोएब ताई, ऋषि आरोठे, लुकमान मेरिवाला, शिवालिक शर्मा, मितेश पटेल, धीरेन मिस्त्री, सोपारिया, प्रत्युष कुमार आणि हार्दिक पांड्या.