भारतीय क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांचा आजही मोठा चाहता वर्ग आहे. लिटल मास्टर गावस्करांनी त्यांचा काळ गाजवला आणि कसोटीत १० हजार धावा करणारे ते पहिले खेळाडू होते. गावस्करांनंतर मास्टर ब्लास्टर सचिनने क्रिकेट विश्व गाजवले अन् तो क्रिकेटचा देव झाला... त्याचा पाहून अनेक खेळाडू घडले आणि त्यातलाच एक विराट कोहलीने तेंडुलकरचा वन डे क्रिकेटमधील ४९ शतकांचा विश्वविक्रम नुकताच मोडला. गावस्कर आणि तेंडुलकर यांची पुन्हा चर्चा रंगण्यामध्ये एक पोस्ट कारणीभूत आहे.
महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी काल त्यांच्या इंस्टाग्रामवर सचीन रेल्वे स्थानकाचा फोटो पोस्ट केला. गावस्करांनी एक फोटो पोस्ट केला आहे आणि ते सचीन नाव असलेल्या रेल्वे स्थानकाचा फोटो पोस्ट केला आणि त्यावर त्यांनी लिहिले की, मागील शतकातल्या लोकांची दूरदृष्टी पाहा, त्यांनी आपल्या खेळातील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आणि माझ्या आवडत्या क्रिकेटपटूच्या नावाने सुरतजवळील रेल्वे स्टेशनला दिले.
त्यावर तेंडुलकरने कमेंट केली की, ''गावस्कर सर, तुमचे शब्द माझ्यासाठी खूप खास आहेत. सचीन रेल्वे स्थानकावर सन्नी हवामान पाहून आनंद झाला.