मुंबई : सिक्सर किंग या नावाने युवराज प्रसिद्ध आहे. युवराजने हे षटकार २००७ साली झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सलग सहा षटकार लगावले होते. त्यानंतर युवराज सिक्सर किंग या नावाने प्रसिद्ध झाला. पण मैदानात एक राडा झाला होता, तो तुम्हाला माहिती आहे का...
इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये सामना सुरु होता. त्यावेळी इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँण्ड्र्यू फ्लिंटॉफने युवराजची कळ काढली. युवराजला ही गोष्ट सहन झाली नाही. युवराज फ्लिंटॉफशी भिडायला गेला. त्यावेळी धोनीही तिथेच होता. पण कूल असलेल्या धोनीला युवराज चुकत नसल्याचे माहिती होती. त्यावेळी त्याने युवराजला त्यावेळी रोखले नाही.
युवराज फ्लिंटॉफशी मैदानात दोन हात करणार, असे दिसत होते. हातात बॅट घेऊन तो फ्लिंटॉफच्या दिशेने जायला लागला. पण मैदानावरील पंचांनी युवराजला रोखले. युवराजनेही क्रिकेट या खेळाचा सन्मान ठेवला. तो माघारी फिरला. हा राग त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा षटकार ठोकून काढला. यावेळी युवराजने ११ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या होत्या.
हा पाहा खास व्हिडीओ