मुंबई : युवराज सिंग गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघातून बाहेर आहे. त्यावेळी युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा विचार केला होता. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या एका निर्णयामुळे युवराजने निवृत्ती घेतली नाही.
युवराज हा भारताच्या १९-वर्षांखालील संघाचा सदस्य होता. त्याने १९-वर्षांखालील विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी करत भारतीय वरिष्ठ संघात स्थान पटकावले होते. विराट कोहलीदेखील १९-वर्षांखालील संघाचा कर्णधार होता. कोहलीने बऱ्याच गोष्टी युवराजकडून शिकल्या होत्या. त्यामुळे युवराज जेव्हा निवृत्तीचा विचार करत होता. तेव्हा कोहलीने त्याला सावरले होते.
युवराजला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते. त्यामुळे तो निवृत्तीचा विचार करत होता. हे जेव्हा कोहलीलाल समजले तेव्हा त्याने युवराजला आपला निर्णय बदलायला सांगितले. त्यानंतर कोहलीने युवराजला भारतीय संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यात युवराजला संधी देण्यात आली. या मालिकेतील दुसरा सामना युवराज खेळला. हा सामना १९ जानेवारी २०१७ रोजी कटक येथील बाराबाती येथे खेळवला गेला होता. पण या सामन्यात युवराजला चांगली कामगिरी करता आली नव्हती.