महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस... तेंडुलकर आज 47 वर्षांचा झाला. 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत तेंडुलकरने अनेक विक्रम नावावर केले आणि त्यापैकी बहुतेक विक्रम मोडता येण्यासारखे नाही. पण, या क्रिकेट कारकिर्दीत असे तीन क्षण आले की जेव्हा तेंडुलकरचा निवृत्तीचा सल्ला दिला गेला. याच चर्चांमध्ये तेंडुलकर एकदा एवढा हताश झाला होता की त्यानं जवळपास निवृत्ती घेण्याचं पक्कं केलं होतं. पण, परदेशातून एक कॉल आला आणि त्यानं निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
ही गोष्ट 2007 सालची आहे. हे वर्ष तेंडुलकरच्या कारकिर्दीतील खराब वर्षांपैकी एक होतं. याच वर्षी वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी वर्ल्ड कप खेळला गेला. या वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. भारतीय संघ मायदेशात परतला तेव्हा त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. पराभवावर टीका होण्यापर्यंत ठिक होतं, परंतु खेळाडूंच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यांना गद्दार म्हटले गेले.
या प्रसंगाचा उल्लेख करताना तेंडुलकरनं त्याच्या आत्मचरित्रात लिहीले की,''2007च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर माझे मानसिक खच्चीकरण झाले होते. मी खेळाचा अजिबात आनंद घेत नव्हतो आणि निवृत्तीबाबत विचार करत होतो. तेव्हा मला सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा फोन आला आणि त्यांनी माझे मनोबल उंचावले. त्यांनी मला वेस्ट इंडिजवरून फोन केला आणि आम्ही जवळपास 45 मिनिटे फोनवर चर्चा केली. माझ्यात बरेच क्रिकेट शिल्लक आहे, असं त्यांनी मला सांगितले. त्यामुळे क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करायला नको, असं त्यांनी मला सांगितले.''
तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमध्ये 49 आणि कसोटीत 51 शतकं झळकावली आहेत. 200 कसोटी क्रिकेट खेळणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याशिवाय सर्वाधिक 463 वन डे सामन्यांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तेंडुलकरनं एकूण 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि त्यात 34,357 धावा केल्या. जगात कोणत्याही क्रिकेटपटूला 30 हजार आंतरराष्ट्रीय धावा करता आलेल्या नाहीत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या...
सचिननं 26/11 हल्ल्यातील शहिदांना वाहिली होती अनोखी श्रद्धांजली...
अंजलीला 'डेट' करण्यासाठी सचिन तेंडुलकर सरदार बनला, अन्...
विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा