खलिस्तानी दहशतवाद्याला भज्जीने संबोधले शहीद!, स्वत:च्याच फिरकीत अडकला हरभजनसिंग

Harbhajan Singh : भज्जीने ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ३७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इन्स्टाग्रावर, ‘सन्मानाने जगणे आणि धर्मासाठी बलिदान’ १ ते ६ जून १९८४ ला सचखंड श्री हरमिंदरसाहिब येथे शहीद झालेल्यांच्या शहादतला प्रणाम!’ असे लिहिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 04:44 AM2021-06-08T04:44:24+5:302021-06-08T04:44:42+5:30

whatsapp join usJoin us
Harbhajan Singh calls Khalistani terrorist a martyr | खलिस्तानी दहशतवाद्याला भज्जीने संबोधले शहीद!, स्वत:च्याच फिरकीत अडकला हरभजनसिंग

खलिस्तानी दहशतवाद्याला भज्जीने संबोधले शहीद!, स्वत:च्याच फिरकीत अडकला हरभजनसिंग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताचा ऑफस्पिनर सोशल मीडियावर ट्रोल झाला. भज्जीने सुवर्ण मंदिरात मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी जर्नलसिंग भिंद्रनवाले याला ‘शहीद’ संबोधताच वाद उद्भवला. भज्जीने ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ३७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इन्स्टाग्रावर, ‘सन्मानाने जगणे आणि धर्मासाठी बलिदान’ १ ते ६ जून १९८४ ला सचखंड श्री हरमिंदरसाहिब येथे शहीद झालेल्यांच्या शहादतला प्रणाम!’ असे लिहिले. भज्जीने भिंद्रनवालेचा उल्लेख केला नाही; पण त्याचा फोटो शेअर केला. दरम्यान, भज्जीने यासाठी माफी मागितली.
हरभजनने म्हटले की, ‘ही माझी चूक होती आणि मी ते स्वीकार करतो. कोणत्याही प्रकारे मी त्या पोस्ट किंवा त्या लोकांचे समर्थन करत नाही. मी असा शीख आहे, जो भारतासाठी लढतो, भारताविरुद्ध नाही.’ 

एफआयआर दाखल करण्याची मागणी
- यावर एका युजरने लिहिले,‘भज्जीला भारतात राहण्याचा अधिकार नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई करावी, शिवाय मिळालेले पुरस्कार त्याच्याकडून काढून घ्यायला हवेत.’ 
- भज्जीने याआधी शाहीद आफ्रिदीच्या फाऊंडेशनला मदत करण्याचे आवाहन केले होते. आता दहशतवाद्यांना शहीद संबोधले. एका युजरने लिहिले, ‘विश्वचषक जिंकताच तू तिरंग्याच्या साक्षीने रडला, आता देशद्रोह्यांचा उदोउदो करतोय! आमच्या मनातून तुझा सन्मान संपला!’
- भज्जीने सोशल मीडियाद्वारेच आपल्या पोस्टबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Harbhajan Singh calls Khalistani terrorist a martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.