मुंबई - आपल्या फिरकीच्या तालावर भल्या भल्या फलंदाजांना नाचवत टर्बनेटर हजभजन सिंगने एकेकाळी क्रिकेट जगतात आपला दबदबा निर्माण केला होता. दरम्यान, हरभजन सिंहने आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये टर्निंग पॉइंट ठरलेल्या घटनेबाबत माहिती दिली आहे. 2000-01 दरम्यान जर तत्कालीन कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे लक्ष आपल्याकडे गेले नसते आणि त्यांनी मला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात घेतले नसते. तर आपल्या क्रिकेट कारकीर्दीचे काय झाले असते कुणास ठाऊक, त्यांनी मला आणि माझ्या कारकीर्दीला पुनर्जन्म दिला, अशी भावूक प्रतिक्रिया हरभजनने दिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर आधारित दादागिरी या कार्यक्रमात हरभजन सिंग म्हणाला, ''त्यावेळी मी बराच काळ संघाबाहेर होतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी मला एनसीएमध्येसुद्धा अयोग्य घोषित करण्यात आलेले होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास हरवला होता. त्यावेळी कर्णधार सौरव गांगुली नसते तर मी कॅनडाला गेलो असतो. मला पाठिंबा देण्यासाठी धन्यवाद.''
2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेआधी अनिल कुंबळे दुखापतग्रस्त झाल्याने हरभजन सिंगला भारतीय संघात स्थान मिळाले होते. या संधीचा पुरेपूर लाभ उठवत हरभजनने त्या मालिकेत 30 हून अधिक बळी टिपत भारताच्या मालिका विजयात मोलाचा वाटा उचला होता. त्या मालिकेत हरभजन मालिकावीर ठरला होता."ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या मालिकेत माझ्याकडे फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. जर मी विकेट्स मिळवल्या नसत्या तर मला संघाबाहेर जावे लागले असते,''असे भज्जीने सांगितले. हरभजन सिंग आता करतोय लग्न जुळवण्याची कामं; सहकाऱ्यासाठी शोधतोय मुलगी
हरभजन सिंगला मोठा धक्का; IPL मधून घेऊ शकतो निवृत्ती
खळबळजनक! अभिनेत्रीच्या माध्यमातून दोन भारतीय क्रिकेटपटूंना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न
त्या मालिकेत मुंबईत झालेल्या पहिल्या कसोटीत मी चार बळी टिपले. त्यानंतर कोलकाता कसोटीत मी हॅटट्रिक घेतली. हे माझ्यासाठी अविश्वसनीन होते, त्या हॅटट्रिकचा आनंदोत्सव प्रेक्षकांनी आणि माझ्या संघसहकाऱ्यांनी साजरा केला. अगदी राहुल द्रविडलाही मी पहिल्यांदाच आनंदोत्सव साजरा करताना पाहिले. त्यामुळे ही माझी नव्हे तर भारतीय संघाची हॅटट्रिक आहे, असे मी नेहमी म्हणतो,''असेह हरभजनने सांगितले. दरम्यान, ''2007 चा टी-20 विश्वचषक जिंकणे हे माझ्यासाठी सर्वात खास होते. पुढे 2011 मध्ये आम्ही टी-20 विश्वचषकही जिंकला, तोसुद्धा माझ्यासाठी महत्त्वपूर्ण क्षण होता, असेही भज्जी म्हणाला.