नवी दिल्ली : भारतीय संघ कसोटीमध्ये जगज्जेता बनण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. टीम इंडियासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. आयपीएल २०२३ चा थरार संपल्यानंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. टप्प्याटप्प्याने टीम इंडियातील शिलेदार आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना होत होते. आयपीएल 'चॅम्पियन' संघाचे खेळाडू अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा हे देखील लंडन येथे दाखल झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
आगामी सामन्याबद्दल क्रिकेट वर्तुळामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. अनेक माजी खेळाडू आगामी सामन्याबद्दल भाकीत वर्तवत आहेत. भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने टीम इंडियाची प्लेइंग निवडली आहे. भज्जीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भज्जीनं निवडलेल्या संघात इशान किशनला संधी मिळाली आहे.
हरभजन सिंगची प्लेइंग इलेव्हनरोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/ रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमेश यादव.
WTC फायनलसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू - यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.