harbhajan singh ipl 2023 | नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मध्ये भारताच्या काही युवा खेळाडूंनी चमकदार खेळी करून आपली छाप सोडली आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केकेआरच्या रिंकू सिंगचा समावेश आहे. जैस्वालने 'यशस्वी' खेळी करून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले, तर रिंकूने एकाच षटकात पाच षटकार ठोकून आपली प्रतिभा दाखवून दिली. अशातच या युवा खेळाडूंना लवकरात लवकर भारतीय संघात संधी मिळावी अशी मागणी भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने म्हटले आहे. याशिवाय भज्जीने यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरचे कौतुक करताना त्याला मोलाचा सल्ला दिला आहे.
भारतीय युवा खेळाडूंबद्दल बोलताना भज्जीने म्हटले, "जर कोणी चांगली कामगिरी करत असेल तर त्याचा संघात समावेश करायला हवा असे मला वाटते. मी हे म्हणत नाही की त्यांना थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्या, पण त्यांना संघात ठेवायला हवे. जेणेकरून ते काहीतरी शिकतील आणि आपल्या खेळात सुधारणा करतील. मला वाटते की, रिंकू सिंग आणि यशस्वी जैस्वाल यांनी वरिष्ठ खेळाडूंसोबत वेळ घालवण्याची ही योग्य वेळ आहे. त्यांना २० किंवा ३० सदस्यीय खेळाडूंच्या गटात ठेवायला हवे. तसेच त्यांना आता संधी द्या, अन्यथा खूप उशीर होऊ शकतो." असे हरभजन सिंगने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटले.
'भस्मासुर'वरून वाद! हिंदी वर्तमानपत्रावर गौतम गंभीर संतापला; २ कोटींची नुकसान भरपाई मागितली
अर्जुनला भज्जीचा मोलाचा सल्ला
रिंकू आणि जैस्वालशिवाय भज्जीने अर्जुन तेंडुलकरबद्दल देखील भाष्य केले. अर्जुनने केकेआरविरूद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याला बळी घेता आला नाही पण पुढच्या सामन्यात त्याने सनरायझर्स हैदराबादविरूद्ध अखेरच्या षटकात २० धावांचा बचाव केला होता. खरं तर एका सामन्यात त्याने एका षटकात ३१ धावा दिल्या होत्या. अशातच कर्णधार रोहितने युवा अर्जुनला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. यावर बोलताना हरभजनने म्हटले, "त्याला अजूनही त्याच्या खेळीत सुधारणा करण्याची गरज आहे. सर्वांनाच यासाठी वेळ लागत असतो. ५० सामने खेळणारा खेळाडू देखील चांगली कामगिरी करेल याची खात्री देता येत नाही. प्रत्येक सामन्यातून तो खूप काही शिकेल."
क्रिकेटच्या 'दादा'च्या सुरक्षेत मोठी वाढ; पश्चिम बंगाल सरकारनं घेतला निर्णय
Web Title: Harbhajan Singh has demanded from BCCI that Rinku Singh and Yashasvi Jaiswal should be given a chance in the Indian team as soon as possible
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.