"धोनीपेक्षा मोठा क्रिकेटर भारतात कोणीच असू शकत नाही", हरभजनकडून कौतुकाचा वर्षाव

harbhajan singh on ms dhoni : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 06:12 PM2023-04-21T18:12:58+5:302023-04-21T18:13:30+5:30

whatsapp join usJoin us
 Harbhajan Singh has said that no cricketer can be greater than MS Dhoni in India | "धोनीपेक्षा मोठा क्रिकेटर भारतात कोणीच असू शकत नाही", हरभजनकडून कौतुकाचा वर्षाव

"धोनीपेक्षा मोठा क्रिकेटर भारतात कोणीच असू शकत नाही", हरभजनकडून कौतुकाचा वर्षाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ms dhoni ipl retirement । मुंबई : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) नाव घेतले जाते. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) संघाने चारवेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. आयपीएल २०२३ मध्ये ५ सामन्यांतील ३ सामने जिंकून धोनीचा संघ आताच्या घडीला गुणतालिकेत सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईचा पुढचा सामना आज सनरायझर्स हैदराबादविरूद्ध (CSK vs SRH) होत आहे. मात्र, संघाचा कर्णधार धोनी यंदा आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करणार का याकडे सर्व क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून आहे.

भज्जीकडून प्रेमाचा वर्षाव 
अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने एक मोठे विधान केले आहे. हरभजनने स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाईव्हवर बोलताना म्हटले, "महेंद्रसिंग धोनी केवळ एक आहे. भारतात त्याच्यापेक्षा मोठा क्रिकेटर होऊ शकत नाही. कोणीच त्याच्याहून अधिक धावा करू शकत नाही आणि कुणीच त्याच्यासारखे कौशल्य दाखवू शकत नाही. याशिवाय त्याच्याएवढा चाहता वर्ग देखील कोणाचा नाही. तो इतरांना एवढा सन्मान देतो की त्याच्या चाहत्यांना त्याचे वेड लागते. धोनीने मागील १५ वर्षांपासून चाहत्यांच्या या भावनेला हृदयात ठेवले आहे. तो अद्याप थोडाही बदललेला नाही."

दरम्यान, धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा आज सनरायझर्स हैदराबादसोबत सामना होत आहे. आरसीबीविरूद्ध सामना जिंकल्यानंतर चेन्नई आपल्या घरच्या मैदानावर हैदराबादशी भिडणार आहे. धोनीचा संघ आताच्या घडीला तीन विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर हैदराबादचा संघ नवव्या स्थानावर आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 


 

Web Title:  Harbhajan Singh has said that no cricketer can be greater than MS Dhoni in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.