Join us  

VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी

LLC 2024 : लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये हरभजन सिंग मणिपाल टायगर्सच्या संघाचे नेतृत्व करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 3:30 PM

Open in App

llc 2024 cricket t20 : सध्या जगभरातील माजी क्रिकेटपटू भारतात होत असलेल्या लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळत आहेत. शिखर धवन आणि दिनेश कार्तिक हे यावेळी पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे. सहा संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू हरभजन सिंग मणिपाल टायगर्सच्या संघाचे नेतृत्व करत आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वातील सदर्न सुपरस्टार्स आणि मणिपाल टायगर्स यांच्यात झालेल्या सामन्यात भज्जीने एक अफलातून षटकार लगावला. हरभजनचा हा षटकार पाहून चाहत्यांना जुना भज्जी आठवला. भरमैदानात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी भिडणारा, निर्भय शैलीत वावरणारा हरभजन त्याच्या विधानांमुळे हल्ली चर्चेत असतो. हरभजनने मारलेल्या या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

मणिपाल टायगर्सचा संघ -हरभजन सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा, थिसारा परेरा, शेल्डन कॉटरेल, डॅन ख्रिश्चियन, अँजेलो परेरा, मनोज तिवारी, असेला गुणरत्ने, सोलोमन मिरे, अनुरीत सिंग, अबू नेचिम, अमित वर्मा, इमरान खान, राहुल शुक्ला, अमितोज सिंग, प्रवीण गुप्ता, सौरभ तिवारी. 

जोधपूर येथून या स्पर्धेला सुरुवात झाली, इथे सुरुवातीचे सहा सामने खेळवले गेले. तसेच २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सूरत येथे सामने पार पडले, तर ३ ऑक्टोबरपासून ७ ऑक्टोबरपर्यंत जम्मूत सामन्यांचा थरार रंगेल. अखेरचे काही सामने ९ ऑक्टोबरपासून श्रीनगर येथे होतील. तर, चेन्नई येथे १६ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. सहा संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात आहेत. लीजेंड्स लीग क्रिकेटचे लाईव्ह सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. याशिवाय फॅनकोड ॲपवर चाहत्यांना ही स्पर्धा पाहता येईल. लीजेंड्स लीग क्रिकेट २०२४ चा पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू झाला, तर काही सामने ३ वाजता देखील खेळवले जातील.

टॅग्स :हरभजन सिंग