Join us  

Harbhajan Singh on MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने वर्ल्ड कप जिंकला, मग बाकीचे 10 खेळाडू काय...!; 2011च्या विजयाचे श्रेय MS Dhoniला मिळाल्याने हरभजन सिंगचा सवाल, Video

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन दशकं वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 8:27 PM

Open in App

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन दशकं वर्चस्व गाजवले. भारताच्या यशस्वी फिरकीपटूंपैकी एक असलेल्या भज्जीने भारताला अनेक अविस्मरणीय आठवणी दिल्या. आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयातही भज्जीने महत्त्वाचा भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय कारकीर्दित कसोटीत 417, वन डेत 269 आणि ट्वेंटी-20त 25 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या भज्जी आयपीएल 2022त समालोचन करत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्यादरम्यान भज्जीने एक वादग्रस्त विधान केले.

भारताने 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप उंचावला. 1983नंतर भारताने ही ऐतिहासिक कामगिरी महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली करून दाखवली. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली होती. त्याने नुवाक कुलसेकराच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून हा अविस्मरणीय विजय मिळवून दिला होता. पण, याच सामन्यात गौतम गंभीरनेही ( Gautam Gambhir) 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. पण, याचा उल्लेख फार कुणी करत नाही, सर्वच वर्ल्ड कप विजयाचे श्रेय धोनीलाच देतात.  

भज्जीने या मुद्यावर त्याच मत मांडले आणि मस्करीत एक विधान केले. त्याच्या मते भारताचा हा विजय सांघिक कामगिरीमुळे असून कुण्या एकाच्या कामगिरीमुळे नाही. आयपीएल 2022च्या सामन्यापूर्वीच्या कार्यक्रमात तो बोलत होता. भज्जी म्हणाला, जेव्हा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा सारे ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला असेच म्हणत होते. पण, जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सारे धोनीने वर्ल्ड कप जिंकला म्हणाले. बाकीचे 10 खेळाडू काय लस्सी प्यायला गेले होते का? गौतम गंभीरने काय केले?, अन्य खेळाडूंनी काय केले?. हा सांघिक खेळ आहे. 7-8 खेळाडू कामगिरी करतात तेव्हा संघ दमदार कामगिरी करू शकतो.'' दोन वर्षांपूर्वी गौतम गंभीरनेही 2011च्या वर्ल्ड कप विजयाचे श्रेय धोनीलाच मिळत असल्यावर नाराजी व्यक्त केली होती.   

टॅग्स :हरभजन सिंगमहेंद्रसिंग धोनी
Open in App