भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगेन शुक्रवारी त्याचा ऑल टाईम फेव्हरिट कसोटी संघ जाहीर केला. मार्च 2016मध्ये भज्जी टीम इंडियाकडून अखेरचा खेळला. त्यानंतर तो इंडियन प्रीमिअर लीगमध्येच खेळत आहे आणि समालोचन करत आहे. त्यानं जाहीर केलेल्या ऑल टाईम कसोटी संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि वासीम अक्रम या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. पण, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भज्जीनं याच संघात सौरव गांगुली, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना स्थान देण्यात आलेले नाही.
भज्जीच्या संघात सलामीची जबाबदारी वीरेंद्र सेहवाग आणि मॅथ्यू हेडन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यानंतर मधल्या फळीत राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस आणि रिकी पाँटिंग यांना स्थान देण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकावरील द्रविडच्या अनुभवाबद्दल भज्जी म्हणाला,''मी ज्याच्यासोबत आणि विरोधात खेळलेल्या फलंदाजांमध्ये द्रविड हा सर्वात विसंबण्याजोगा खेळाडू आहे. परिस्थिती कशीही असो, मग ती जलद माऱ्याला किंवा फिरकी गोलंदाजीला पूरक असो द्रविडकडे त्याचा सामना करण्याचे योग्य तंत्र आहे.''
भज्जीनं त्याच्या संघात यष्टिरक्षकाची जबाबदारी श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा याच्याकडे सोपवली आहे. तो म्हणाला,''अॅडम गिलख्रिस हा ग्रेट खेळाडू आहे, परंतु संगकाराचे रेकॉर्ड बरचं काही सांगून जातात. त्यानं कसोटीत 57च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. याशिवाय यष्टिरक्षणातही त्याला तोड नाही.'' गोलंदाजी विभागाची जबाबदारी भज्जीनं शॉन पोलॉक, शेन वॉर्न, वासीम अक्रम आणि ग्रेन मॅक्ग्राथकडे सोपवली आहे.
हरभजन सिंगचा ऑल टाईम कसोटी संघ
वीरेंद्र सेहवाग, मॅथ्यू हेडन, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर. जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग ( कर्णधार), कुमार संगकारा, शॉन पोलॉक, शेन वॉर्न, वासीम अक्रम, ग्लेन मॅक्ग्राथ
IPL 2020: CSKचा कर्णधार MS Dhoniनं खेचले सलग पाच चेंडूंत षटकार, Video
IPL 2020 : Mumbai Indians चे 11 शिलेदार यंदा धुमाकूळ घालणार, सर्वांवर भारी पडणार!
ट्वेंटी-20त Hardik Pandyaची आणखी एक वादळी खेळी, 20 षटकारांची आतषबाजी
IPL 2020 : Rohit Sharma म्हणतो यंदाचे जेतेपद आमचेच, सांगितलं अनोखं लॉजिक!
BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं नाही दिली Ravindra Jadejaला खेळण्याची परवानगी, जाणून घ्या का!
IPL 2020च्या बक्षीस रकमेतील कपात ही कॉस्ट-कटिंग नाही; BCCIनं सांगितलं खरं कारण!
विंडीजचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार Daren Sammyकडे पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद
असा असावा नवरा; बायकोच्या फायनलसाठी स्टार गोलंदाजानं अर्धवट सोडला दौरा
Web Title: Harbhajan Singh picks his all-time Test playing XI; no place for Virat Kohli & Sourav Ganguly svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.