भारताचा स्टार फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यानं त्याची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन संघ निवडला आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या फेसबूक पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे आणि त्यात भज्जीनं त्याच्या ऑल टाईम प्लेईंग इलेव्हन संघ जाहीर केला. भज्जीनं त्याच्या संघात सलामावीर म्हणून सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा ही जोडी निवडली आहे. त्याशिवाय तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याची निवड केली आहे. अष्टपैलू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू जॅक कॅलिस यालाही अंतिम ११मध्ये स्थान दिले आहे.
सहाव्या क्रमांकावर भज्जीनं इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॉफ आणि यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीची निवड केली आहे. संघात शेन वॉर्न व मुथय्या मुरलीधरन या दोन दिग्गज फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे. त्याच्या या निवडीमुळे सर्वांना आश्चर्य वाटले. भज्जीनं त्याच्या संघात भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे याला स्थान दिलेले नाही. जलदगती गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा वासीम अक्रम आणि श्रीलंकेचा लसिथ मलिंगा यांची निवड करण्यात आलेली आहे.
हरभनज सिंगची प्लेईंग इलेव्हन - सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस, अँड्य्रू फ्लिंटॉफ, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शेन वॉर्न, वासीम अक्रम, लसिथ मलिंगा, मुथय्या मुरलीधरन