Join us  

हरभजन खेळणार राजकीय इनिंग? निवृत्तीनंतर भज्जीच्या नव्या खेळीची चर्चा

क्रिकेट खेळाने मला ओळख दिली. आयुष्यात क्रिकेटमुळे मला सारं काही मिळालं. २३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मला अनेकांनी सहकार्य केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 12:07 PM

Open in App
ठळक मुद्देपुढे काय करायचं हे विचार करण्यासाठी मला 2-3 दिवस हवे आहेत. मी राजकारणात जाणार असेल तर कसा आणि कुठे? याचाही मला विचार करावा लागेल. कारण, लोकांची मदत करणे हेच माझे पहिल्य लक्ष्य असेल, असेही त्यांने सांगितले.  

मुंबई - भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ट्वीट करून त्याने हा निर्णय जाहीर केला. "सगळ्या चांगल्या गोष्टी एक दिवस संपतात. आज मी माझ्या आवडत्या खेळाला निरोप देत असून निवृत्तीची घोषणा करत आहे, असे भज्जीनं म्हटलं. भज्जीच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी काही दिवसांत पंजाबमध्ये निवडणुका होत आहे. त्यामुळे, भज्जीच्या राजकीय इंनिंगची चर्चा रंगली आहे. 

क्रिकेट खेळाने मला ओळख दिली. आयुष्यात क्रिकेटमुळे मला सारं काही मिळालं. २३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मला अनेकांनी सहकार्य केलं. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व खेळाडूंचे आणि चाहत्यांचे मनापासून आभार", असं ट्वीट करत हरभजनने सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. हरभजनने IPL 2022च्या आधी निवृत्तीची घोषणा केल्यामुळे आता तो नव्या हंगामात एखाद्या संघाचा प्रशिक्षक किंवा मेंटॉर म्हणून भूमिका बजावू शकतो. मात्र, दुसरीकडे निवडणुकांचा काळ पाहून भज्जीच्या राजकीय मैदानावर उतरण्याचीही चर्चा होत आहे. 

काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धूसोबत काही दिवसांपूर्वीत हरभजनसिंगचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये, ‘‘संभावनाओं से भरी तस्वीर’’, असा आशय लिहिण्यात आला होता. त्यामुळे, भज्जीच्या राजकीय प्रवेशाचीही चर्चा होत आहे. हरभजनने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी पुढे काय करेन हे मला माहिती नाही. मला समाजाची परतफेड करायची आहे. त्यामुळेच, पुढे काय करायचं हे विचार करण्यासाठी मला 2-3 दिवस हवे आहेत. मी राजकारणात जाणार असेल तर कसा आणि कुठे? याचाही मला विचार करावा लागेल. कारण, लोकांची मदत करणे हेच माझे पहिल्य लक्ष्य असेल, असेही त्यांने सांगितले.  

जाणकारांना काय वाटतं?

क्रिकेट जाणकारांच्या मते सध्या तरी हरभजन सिंग एखाद्या आयपीएल संघाच्या फिरकी प्रशिक्षकपदी किंवा मार्गदर्शकपदी दिसू शकतो. तसेच, IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये एखाद्या संघाला खेळाडू निवडून देण्यासाठी हरभजनचा अनुभव नक्कीच कामी येऊ शकतो. कारण, हरभजनने कोलकाताच्या आधी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन बड्या आणि यशस्वी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. 

टॅग्स :हरभजन सिंगराजकारणपंजाबनिवडणूकनवज्योतसिंग सिद्धू
Open in App