पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठे बदल घडत आहेत. रविवारी पीसीबीने एकदिवसीय आणि टी- २० संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली. मोहम्मद रिझवानकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. पाकला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यांपूर्वीच मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सहा महिन्यांच्या आतच प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. खरे तर कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यायला हवा, असे भारताचा माजी खेळाडूी हरभजन सिंगने म्हटले होते. तसेच त्याने त्यांना भारतात टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले होते. आता भज्जीने यावर मजेशीर इमोजी शेअर करुन प्रतिक्रिया दिली.
कर्स्टन यांना एप्रिल २०२४ च्या अखेरीस वनडे आणि टी-२० संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी आयपीएल २०२४ मध्ये गुजरात टायटन्ससोबतचे प्रशिक्षक आणि मेंटॉरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर जूनमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी हाती घेतली होती. पण, आता त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला असून, त्यांचा राजीनामा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वीकारला आहे. कर्स्टन यांनी वनडे आणि टी-२० संघाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर लगेचच पीसीबीने ही जबाबदारी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज जेसन गिलेस्पीकडे सोपविली.
गिलेस्पी पाकिस्तानच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ते ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच वनडे आणि टी-२० संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी सांभाळतील. गिलेस्पी पाकिस्तानच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ते ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच वनडे आणि टी-२० संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी सांभाळतील. कर्स्टन यांनी पीसीबी प्रमुख महोसिन नकवी यांना सर्व माहिती दिल्यानंतर जबाबदारीमुक्त होण्याचा निर्णय घेतला.