Sreesanth Reaction on Harbhajan Singh Retirement : भारतीय संघाचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग याने आज सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तब्बल २३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्याने आज हा निर्णय घेतला. हरभजनने आपल्या कारकिर्दीत १००हून अधिक कसोटी सामने खेळले. तसंच, त्याने ७००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय बळी टिपले. गेल्या काही वर्षांमध्ये त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेर आज त्याने क्रिकेटला रामराम ठोकला. गेले दोन-तीन वर्षे तो समालोचकाच्या भूमिकेत दिसला आहे. त्यामुळे यापुढे तो याच भूमिकेत दिसेल किंवा एखाद्या IPL संघाच्या प्रशिक्षकपदीही दिसण्याची शक्यता आहे. हरभजनने निवृत्तीची घोषणा करताच त्याच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एस श्रीसंतनेदेखील ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
IPL मध्ये हरभजनने श्रीसंतला भरमैदानात कानशिलात लगावली होती. तो किस्सा क्रीडाप्रेमींना आजही लक्षात आहे. त्यानंतर बराच गोंधळ माजला होता. पण श्रीसंत आणि हरभजन यांनी खिलाडीवृत्तीने तो वाद मिटवला होता. आज हरभजनने निवृत्ती जाहीर केल्यावर श्रीसंतने एक ट्वीट करत आपल्या भावना मांडल्या. "हरभजनपाजी, केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण जगाच्या क्रिकेट इतिहासात तुम्ही सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहात. तुमच्या सोबत खेळायला मिळायला मिळालं हे माझं भाग्यच आहे. संघाच्या सेलिब्रेशनच्या वेळी तुम्ही आम्हा सहकाऱ्यांना मारलेल्या मिठ्या नक्कीच लक्षात राहतील. तुमच्यबद्दल मनात कायमच प्रेम आणि आदर राहिल. तुम्हाला शुभेच्छा", असं ट्वीट श्रीसंतने केलं.
श्रीसंतशिवाय इतरही अनेक आजी माजी खेळाडूंनी आणि चाहत्यांनी हरभजनला शुभेच्छा दिल्या.
अनिल कुंबळे-
अमित मिश्रा-
इरफान पठाण-
गौतम गंभीर-
सुरेश रैना-
युसूफ पठाण-
मयंक अग्रवाल-
उमेश यादव-
शुबमन गिल-
मनोज तिवारी-
हरभजन सिंगने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण १०३ कसोटी सामन्यात ४१७ बळी टिपले. तसेच २३६ एकदिवसीय सामन्यात २६९ गडी बाद केले. टी२० क्रिकेटमध्ये त्याला सुरूवातील संधी मिळाली पण नंतर त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्यामुळे त्याने केवळ २८ टी२० सामनेच खेळले आणि त्यात त्याने २५ बळी टिपले.