भारताच्या सर्वांत यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक ऑफस्पिनर हरभजनसिंग याने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच, या दिग्गज खेळाडूची २३ वर्षांची कारकीर्द संपली. पंजाबच्या ४१ वर्षांच्या या खेळाडूने १०३ कसोटीत ४१७, २३६ वन डेत २६९ आणि टी-२० त २५ गडी बाद केले आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यानं भारतीय संघाला दोन वेळा विश्वचषक जिंकवून दिले आहेत. तसंच कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यानं निराळ्या अंदाजात सेलिब्रेशन केलं.
हरभजनची पत्नी गीता बसरानं सोशल मीडियावर दोन निराळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. एका फोटोमध्ये गीता आणि हरभजन हे ड्रिंक्स पिताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये तिनं केवळ सेलिब्रेटिंग यू असं लिहिलं आहे. यासोबतच तिनं एक हार्ट इमोजीदेखील शेअर बनवला आहे.
गीतानं आणखी एक पोस्ट इन्टाग्रामवर शेअर केली. त्यामध्ये तिनं भावूक होत पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिनं हरभजनच्या नव्या इनिंग्सचेही संकेत दिले. "तू या वेळेची दीर्घ कालावधीपासून वाट पाहत होता. मानसिकरित्या तू पहिलेच हा निर्णय घेतला होता. आता केवळ औपचारिक निर्णय बाकी होता. आपल्या कारकिर्दीत तू खुप काही मिळवलं आहेस आणि मला तुझ्यावर अभिमान आहे," असं तिनं लिहिलं आहे.
"पुढे जाण्याचा हा प्रवास याप्रकारेच सुरू राहणार आहे. अजून अनेक गोष्टी आहे, ज्या तुमची वाट पाहत आहेत. खेळादरम्यान मी तुला तणाव आणि मस्ती या दोन्ही मूडमध्ये पाहिलं आहे. २३ वर्षे क्रिकेट खेळणं सोप नाही. मुलगी हिनाया हीनंही वडलांना स्टेडियममध्ये खेळताना पाहिलंय. मी भाग्यवान आहे की मी या क्षणांचा अनुभव घेऊ शकले," असं तिनं लिहिलं आहे.
कसोटीत हॅट्ट्रिकआयपीएलमध्ये एखाद्या संघाच्या सपोर्ट स्टाफची भूमिका बजाविण्याची भज्जीची इच्छा आहे. भज्जीने पहिली कसोटी १९९८ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. २०१५ ला श्रीलंकेविरुद्ध खेळलेली कसोटी त्याची अखेरची ठरली. हरभजन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. यंदा तो केकेआर संघात होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्याला एकही सामना खेळता आला नाही. मार्च २००१ ला कोलकाता येथे दुसऱ्या कसोटीत हरभजनने ७२ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज रिकी पॉंटिंग (६), ॲडम गिलख्रिस्ट (००) आणि शेन वॉर्न (००) यांना पाठोपाठ बाद करीत ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली होती.
Web Title: harbhajan singh retires from all cricket forms actor wife geeta basra shares post social media instagram twitter
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.