भारताच्या सर्वांत यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक ऑफस्पिनर हरभजनसिंग याने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच, या दिग्गज खेळाडूची २३ वर्षांची कारकीर्द संपली. पंजाबच्या ४१ वर्षांच्या या खेळाडूने १०३ कसोटीत ४१७, २३६ वन डेत २६९ आणि टी-२० त २५ गडी बाद केले आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यानं भारतीय संघाला दोन वेळा विश्वचषक जिंकवून दिले आहेत. तसंच कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यानं निराळ्या अंदाजात सेलिब्रेशन केलं.
हरभजनची पत्नी गीता बसरानं सोशल मीडियावर दोन निराळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. एका फोटोमध्ये गीता आणि हरभजन हे ड्रिंक्स पिताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये तिनं केवळ सेलिब्रेटिंग यू असं लिहिलं आहे. यासोबतच तिनं एक हार्ट इमोजीदेखील शेअर बनवला आहे.
"पुढे जाण्याचा हा प्रवास याप्रकारेच सुरू राहणार आहे. अजून अनेक गोष्टी आहे, ज्या तुमची वाट पाहत आहेत. खेळादरम्यान मी तुला तणाव आणि मस्ती या दोन्ही मूडमध्ये पाहिलं आहे. २३ वर्षे क्रिकेट खेळणं सोप नाही. मुलगी हिनाया हीनंही वडलांना स्टेडियममध्ये खेळताना पाहिलंय. मी भाग्यवान आहे की मी या क्षणांचा अनुभव घेऊ शकले," असं तिनं लिहिलं आहे.