भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यानं बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पोस्ट करून भज्जीनं दिल्ली पोलीस व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओत एका मुलानं तिच्या आईला कानाखाली मारली आणि त्यानंतर त्या वृद्ध महिलेचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. IND vs ENG : विराट कोहलीचा पारा चढला, शार्दूल ठाकूरला नको ते बोलला, Video
भज्जी प्रचंड रागात होता आणि त्यानं पोस्टवर लिहिले की,''आईपेक्षा श्रेष्ठ कुणी नाही आणि जो मुलगा आपल्या आईवर हात उचलतो, तो माणूस होऊच शकत नाही. हा व्हिडीओ पाहून दुखी झालो. अशा मुलाला जगण्याचा अधिकार नाही. दिल्ली पोलीस व मुख्यंमत्री केजरीवाल यांनी या घटनेची दखल घेऊन लगेच कारवाई करावी.''
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ दिल्ली येथील द्वारकामधील बिंदापूर भागातला आहे. जिथे रणवीर नावाच्या एका व्यक्तीनं त्याच्या वृद्ध आईला कानाखाली मारली. त्यानंतर त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आणि तिथे तिचा मृत्यू झाला. अवतार कौर असं या महिलेचं नाव आहे आणि त्या 76 वर्षांच्या होत्या.