Harbhajan Singh: क्रिकेटर हरभजन सिंग झाला खासदार! Sanjay Raut अन् २६ जणांसोबत घेतली शपथ, Video देखील केला पोस्ट

राष्ट्रपती पदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत हरभजनने केलं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:49 PM2022-07-18T16:49:33+5:302022-07-18T16:50:31+5:30

whatsapp join usJoin us
Harbhajan Singh took oath as Member of Parliament in Rajya Sabha along with Shivsena Sanjay Raut and 26 others watch video | Harbhajan Singh: क्रिकेटर हरभजन सिंग झाला खासदार! Sanjay Raut अन् २६ जणांसोबत घेतली शपथ, Video देखील केला पोस्ट

Harbhajan Singh: क्रिकेटर हरभजन सिंग झाला खासदार! Sanjay Raut अन् २६ जणांसोबत घेतली शपथ, Video देखील केला पोस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Harbhajan Singh Sanjay Raut: क्रिकेटमधून राजकारणात आलेला ऑफस्पिनर हरभजन सिंगने आज राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभेच्या खासदाराची जागा त्याने नुकतीच जिंकली होती. त्यानंतर तो शेतकऱ्यांच्या बाजूने राजकारणात सक्रीय झाला. त्याने शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम सुरू केले. याच दरम्यान, संजय राऊत, माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, कपिल सिब्बल, प्रफुल्ल पटेल आणि हरभजन सिंग सहित एकूण २८ नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांनी सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सकाळच्या सत्रात शपथ घेतली.

सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पदाची शपथ दिली. शपथ घेणाऱ्यांमध्ये ११ राज्यांतील सदस्य आणि एक नामनिर्देशित सदस्याचा समावेश होता. या सदस्यांनी हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, ओडिया, मराठी आणि पंजाबी भाषांमध्ये शपथ घेतली. हरभजन सिंगने पंजाबीतून शपथ घेतली. त्याने या अभिमानास्पद क्षणाचा व्हिडीओ ट्वीट केला. 'राज्यसभेचा सदस्य म्हणून आज शपथ घेतली. राज्यघटनेच्या संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने मी कटिबद्ध असेन. पंजाबच्या जनतेसाठी आणि सर्व भारतीयांसाठी मी माझ्या परिने जे शक्य असेल ते सर्व काही करेन. जय हिंद जय भारत', असे कॅप्शनही त्याने लिहिले. त्यानंतर हरभजनने राष्ट्रपती पदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीसाठी आपला हक्क देखील बजावला.

--

सर्वप्रथम, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी युवाजन श्रमिका रायतू, काँग्रेस पक्षाचे (वायएसआर काँग्रेस) मस्तान राव बिदा यांनी इंग्रजीत शपथ घेतली. यानंतर वायएसआर काँग्रेसचे विजय साई रेड्डी यांनी तेलुगूमध्ये शपथ घेतली. बिहारमधून राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) फयाज अहमद आणि मीसा भारती, जनता दल (युनायटेड)चे खिरू महतो आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शंभू शरण पटेल यांनी शपथ घेतली. छत्तीसगडमधून काँग्रेसचे रणजीत रंजन आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी, झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) महुआ माझी आणि भाजपचे आदित्य प्रसाद यांनी, कर्नाटकातून भाजपाकडून चित्रपट अभिनेता जग्गेश यांनी तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सदस्यपदाची शपथ घेतली.

Web Title: Harbhajan Singh took oath as Member of Parliament in Rajya Sabha along with Shivsena Sanjay Raut and 26 others watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.