'आम्हाला ठेंगा मिळालाय' असं म्हणत चाहत्यावर संतापला हरभजन सिंग

क्रिकेटचं मैदान असो किंवा सोशल मीडिया क्रिकेटपटू हरभजन सिंगचा राग कोणापासून कधी लपून राहिलेला नाही. पुन्हा एकदा त्याचा राग अनावर झाला आणि तोही त्याच्याच चाहत्यावर

By Sagar.sirsat | Published: August 22, 2017 01:14 PM2017-08-22T13:14:29+5:302017-08-22T14:59:21+5:30

whatsapp join usJoin us
Harbhajan singh tweet on Amrapali | 'आम्हाला ठेंगा मिळालाय' असं म्हणत चाहत्यावर संतापला हरभजन सिंग

'आम्हाला ठेंगा मिळालाय' असं म्हणत चाहत्यावर संतापला हरभजन सिंग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे एका चाहत्याने हरभजनला ''सर तुम्हाला तर फ्री व्हिला(बंगला) मिळाला आहे.... आमचे तर पैसेसुद्धा पाण्यात गेले....'' असं ट्विट करून म्हटलं.त्याच्या या ट्विटवर हरभजन सिंग चांगलाच संतापला. 

मुंबई, दि. 22 - क्रिकेटचं मैदान असो किंवा सोशल मीडिया क्रिकेटपटू हरभजन सिंगचा राग कोणापासून कधी लपून राहिलेला नाही. पुन्हा एकदा त्याचा राग अनावर झाला आणि तोही त्याच्याच चाहत्यावर पण यावेळी कारण जरा वेगळं आहे. एका चाहत्याने हरभजनला ''सर तुम्हाला तर फ्री व्हिला(बंगला) मिळाला आहे.... आमचे तर पैसेसुद्धा पाण्यात गेले....'' असं ट्विट करून म्हटलं. त्याच्या या ट्विटवर हरभजन सिंग चांगलाच संतापला. 

या चाहत्याला उत्तर देताना त्याने 'आम्रपाली' समूहावर जोरदार टीका केली आहे.  ''भाई तुला कोणी सांगितलं की आम्हाला व्हिला मिळाला आहे. ठेंगा मिळालाय आम्हाला.....आम्हाला मूर्ख बनवण्यात आलंय.....आमच्या नावांचा वापर करून नागरिकांचा पैसे चोरले आहेत..... ''असं उत्तर हरभजनने दिलं. 




 काय आहे प्रकरण-
2011 च्या वर्ल्डकपनंतर आम्रपाली समूहाचे सीएमडी अनिल शर्मा यांनी 11 क्रिकेटपटूंना घरं देण्याची घोषणा केली होती, पण अजूनपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला व्हिला देण्यात आलेला नाही. काही वर्षांपूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आम्रपाली’ सोबतचा करार रद्द केला होता. आम्रपाली या रियालिटी इस्टेट कंपनीचा तो ब्रॅण्ड ऍम्बेसेडर होता.  
 त्यावेळी ‘आम्रपाली’ सोबत ब्रेकअप केल्यानंतर हरभजनने ट्विट करून धोनीचं कौतुक केलं होतं. ‘आम्रपाली बिल्डर्ससोबतचं नातं तोडून धोनी तू चांगलं काम केलं आहेस. २०११ च्या वर्ल्डकपनंतर त्यांनी आपल्याला घरं देण्याची घोषणा केली होती, मात्र त्यांनी अद्याप दिलेलं नाही”, असं  हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. यानंतर आणखी एक ट्विट करत हरजभन सिंगने “आम्हाला घरं देण्याची घोषणा हा त्यांचा पब्लिसिटी स्टंट असू शकतो. मात्र किमान ज्यांनी पैसे दिलेत त्यांना तरी त्यांनी घरं द्यायला हवीत”, असं ट्विट केलं होतं.  

Web Title: Harbhajan singh tweet on Amrapali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.