पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांमध्ये एक भाषण दिले होते. या भाषणानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग यांनी इम्रान यांच्यावर जोरदार टीका केली होती. सेहवागने आपल्या ट्विटरवर इम्रान यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एक टीव्ही अँकर इम्रान यांच्यावर टीका करत होती. पण, भज्जीची ही टीका अभिनेत्री विणा मलिकला आवडलेली नाही. तिनं भज्जीवर टीका केली.
हरभजनने ट्विट केले की,''UNGA ला केलेल्या भाषणात इम्रान खान यांनी रक्तपात करण्याची भाषा केली. त्यांच्या या भाषणातून दोन्ही देशांमधील द्वेश अधिक वाढणार आहे. एक खेळाडू म्हणून मी त्यांच्याकडून शांतीच्या प्रस्तावाची अपेक्षा करत होतो.'' त्यावर विणा मलिकनं भज्जीला डिवचलं. ती म्हणाली,''पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या भाषणातून शांतीचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी सत्य आणि भिषण यातील वास्तव सांगितले. ( भज्जी) तुला कदाचीत इंग्रजी कळलं नसावं.'' भज्जीनंही तिला सडेतोड उत्तर देत, पुढच्या वेळेस ट्रोल करण्याचा प्रयत्न कर, असा सल्ला दिला.