भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने ( Wriddhiman Saha ) शनिवारी मैदानाबाहेर जोरदार फटकेबाजी केली. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान न मिळाल्यानंतर सहाने धडाधड मुलाखती दिल्या आणि त्याने BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर तोफ डागली. त्यानंतर सोशल मीडियावर साहाने खळबळजनक पोस्ट लिहीली आणि एका कथित पत्रकाराचे वाभाडे काढले. साहाला आता क्रिकेट वर्तुळातूनही पाठिंबा मिळतोय आणि माजी खेळाडू हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांनी त्या पत्रकाराचे कान टोचले.
वृद्धिमान साहाने नेमकं काय ट्विट केलं?
साहाने स्क्रिनशॉटचा एक फोटो ट्विटरवर ट्विट केला. त्यात त्याच्या आणि एका पत्रकारामधील संवाद दिसत आहे. हा फोटो शेअर करताना साहाने लिहिले की, भारतीय क्रिकेटमध्ये माझ्या संपूर्ण योगदानानंतर एका तथाकथित सन्माननीय पत्रकाराकडून या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. पत्रकारिता कुठे गेली आहे. त्या स्क्रिनशॉटमध्ये लिहिले की, माझ्यासोबत एक मुलाखतीचा कार्यक्रम कराल का, जर तुम्ही लोकशाहीवादी बनू इच्छित असाल तर मी त्यासाठी तुमच्यावर दबाव आणणार नाही. त्यांनी केवळ एका यष्टीरक्षकाची निवड केली आहे. तू ११ पत्रकार निवडण्याचा प्रयत्न केला. ही बाब माझ्या मते योग्य नाही. त्यांची निवड करा जे तुमची अधिकाधिक मदत करू शकतील. तू कॉल केला नाहीस. मी आता तुझा कधीही इंटरव्यू घेणार नाही आणि ही गोष्ट मी कायम लक्षात घेईन.
वीरेंद्र सेहवाग पत्रकाराला म्हणाला चमचा...साहाच्या पोस्टला रिप्लाय देताना वीरूने लिहिलं की, हे पाहून खूप दुःख झाले. ही पत्रकारिता नव्हे तर चमचागिरी आहे. मी तुझ्यासोबत आहे वृद्धि...