मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या पहिल्या हंगामात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्याकडून एक चूक झाली होती आणि 11 वर्षांनंतर त्याला त्याचा पश्चाताप होत आहे. 2008 मध्ये हरभजनने भारताचा जलदगती गोलंदाज एस श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना संपल्यानंतरची ही घटना. तेव्हा भज्जी मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत होता आणि श्रीसंत पंजाब संघाकडून खेळत होता. या घटनेची आठवण करताना, मला तसं करायला नको होतं, अशी कबुली हरभजनने दिली.
हरभजन सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य आहे आणि त्याच्या नावावर आयपीएलची चार जेतेपद आहेत. यातील तीन जेतेपद ही त्याने मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेली आहेत. दुसरीकडे 2013च्या आयपीएल स्पॉट फिक्सिगं प्रकरणात अडकल्यानंतर श्रीसंत क्रिकेटपासून दूरच आहे. बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली आहे.
पाहा व्हिडीओ...