भज्जीने वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटीसाठी निवडली Playing XI; ऋतुराजला ठेवलं संघाबाहेर

India vs West Indies 1st Test Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला १२ जुलैपासून सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 01:46 PM2023-07-11T13:46:59+5:302023-07-11T13:47:34+5:30

whatsapp join usJoin us
Harbhajan Singh's India XI for the first Test against West Indies and has included Mukesh Kumar and Yashasvi Jaiswal in the squad | भज्जीने वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटीसाठी निवडली Playing XI; ऋतुराजला ठेवलं संघाबाहेर

भज्जीने वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटीसाठी निवडली Playing XI; ऋतुराजला ठेवलं संघाबाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Harbhajan Singh’s India XI for the first Test against West Indies :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला १२ जुलैपासून अर्थात उद्यापासून सुरूवात होत आहे. भारताकडून सलामीच्या सामन्यातून यष्टीरक्षक इशान किशन आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार पदार्पण करण्याची शक्यता आहे. यावर अनेक माजी खेळाडू आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. 

भज्जीने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "माझ्या मते, रोहित शर्मा आणि शुबमन गिलने सलामीवीर म्हणून डावाची सुरूवात करायला पाहिजे आणि यशस्वी जैस्वालने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे. अनेकजण म्हणत होते की यशस्वीने सलामीवीर म्हणून खेळायला हवे आणि गिलने मधल्या फळीत खेळावे. पण मला असे वाटत नाही. कारण शुबमनने स्वतःची जागा बनवली आहे. त्यामुळे यशस्वीने तिसऱ्या क्रमांकावर खेळायला हवे असे मला वाटते. मला आशा आहे की तो पदार्पण करेल", असे हरभजन सिंगने म्हटले. 

हरभजनची प्लेइंग XI - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, श्रीकर भरत, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार.
 
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक 

  1. पहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका (वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) 
  2. दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, (वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)

 

Web Title: Harbhajan Singh's India XI for the first Test against West Indies and has included Mukesh Kumar and Yashasvi Jaiswal in the squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.