नवी दिल्ली : अनुभवी फिरकीपटू हरभजनसिंग याच्याकडून चेन्नईच्या एका उद्योगपतीने चार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्यास तो टाळाटाळ करीत असल्याचे पुढे आल्याने हरभजनने चेन्नई शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
एका मित्राच्या माध्यमातून हरभजन हा जी. महेश या उद्योगपतीला भेटला होता. त्यानंतर हरभजनने या उद्योगपतीला २०१५ साली चार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर हरभजनने या उद्योगपतीकडे पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला. त्याने हरभजनला काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे हरभजनने आता न्यायालयातही धाव घेतली आहे.
गेल्या महिन्यात महेशने हरभजनला २५ लाख रुपयांचा चेक दिला होता. पण खात्यामध्ये पैसे नसल्यामुळे हा चेक बाऊन्स झाला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी हरभजन चेन्नईला गेला होता आणि त्याने पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या उद्योगपतीला समन्सही बजावले. महेशने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपण हरभजनकडून कर्ज घेतले आणि त्यासाठी एक प्रॉपर्टी तारण म्हणूनही ठेवलेली आहे. पण मी हरभजनचे सर्व पैसे परत करेन, असे म्हटले आहे. कौटुंबिक कारणांमुळे हरभजन यंदा आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. तो सध्या आपल्या घरी पंजाबमध्येच आहे. (वृत्तसंस्था)
Read in English
Web Title: Harbhajan was robbed of Rs 4 crore by an industrialist
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.