इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) आज चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात षटकारांचा पाऊस पडला. शारजाहचे स्टेडियम लहान असल्याने प्रत्येकाने बॅटीवर चांगलाच हात आजमावला. या पूर्ण सामन्यात 33 षटकार लगावले गेले. राजस्थान रॉयल्सकडून ( RR) 17, तर चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) 16 षटकार लगावले गेले. CSKच्या पराभवानंतर Suresh Raina याने केलेलं ट्विट व्हायरल होत आहे. ( CSK vs RR Live Score & Updates )
महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं
'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; मुंबईकर फलंदाजाचे RRकडून पदार्पण
संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video
आजच्या सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. सॅमसननं 32 चेंडूंत 1 चौकार व 9 षटकारासह 74 धावा केल्या. स्मिथ 47 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 69 धावांवर माघारी परतला. आर्चरने 8 चेंडूंत 4 षटकार खेचून नाबाद 27 धावा केल्या. एनगिडीनं अखेरच्या षटकात दोन नो बॉल व एक व्हाईड ब़ॉलही टाकला. RRने निर्धारित षटकात 7 बाद 216 धावा चोपल्या.
217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( Shane Watson) 33 धावा करून माघारी परतला. फॅफ डू प्लेसिसनं ( Faf du Plessis) 37 चेंडूंत 72 धावा चोपल्या. त्यात 1 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. धोनीने अखेरच्या षटकात काही उत्तुंग फटके मारले, परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. CSKने 6 बाद 200 धावा केल्या. RRने 16 धावांनी हा सामना जिंकला. धोनीनं 17 चेंडूंत 3 षटकारांसह नाबाद 29 धावा केल्या.
IPL 2020 मधून सुरेश रैनाची माघार
सुरेश रैनानं ( Raina) काही वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या IPL 2020मधून माघार घेतली. मायदेशात परतल्यानंतर त्यानं पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्याला BCCIकडून परवानगीची प्रतीक्षा आहे. दरम्यान मायदेशातून तो टीमला सपोर्ट करताना दिसत आहे. CSKच्या सलामीच्या सामन्यातील विजयानंतर त्यानं अभिनंदनाचं ट्विट केलं होतं. तसंच आजच्या सामन्यातनंतरही त्यानं ट्विट केलं. CSKच्या मधल्या फळीच्या अपयशानंतर फॅन्सला रैनाची उणीव नक्कीच जाणवली असेल.
सुरेश रैना काय म्हणाला?
फॅफ तू चांगला खेळलास.. आज नशीबाची साथ मिळाली नाही, परंतु या पराभवानंतर आपण दणक्यात पुनरागमन करू. जसं नेहमी करतो तसंच. महेंद्रसिंग धोनीची नेहमीप्रमाणे दमदार फटकेबाजी. संजू सॅमसन तुझेही कौतुक.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हॅण्डलवर झाली चूक; टाय सामना नेमका कोणता?
रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ
यशस्वी जैस्वाल जेव्हा MS Dhoni ला भेटला, सामन्यापूर्वी त्यानं जे केलं ते पाहाच
SRHवरील विजयानंतर विराट कोहली अँड टीमनं ड्रेसिंग रुममध्ये घातला 'धिंगाणा', Video
युजवेंद्र चहलनं SRHच्या फलंदाजांना गुंडाळले; फिरकीपटूच्या होणाऱ्या पत्नीनं 'ही' पोस्ट लिहिली
Web Title: Hard luck tonight but we will come back stronger, as always, Suresh Raina Tweet after RR beat CSK by 16 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.