नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड केल्यानंतर भारतीय संघाला ५ फेब्रुवारीपासून इंग्लडविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीने १८ खेळाडूंचा संघ मंगळवारी जाहीर केला. पितृत्व रजेनंतर कर्णधार विराट कोहली याच्यासह वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू देण्यात आला आहे. अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे ईशांत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला होता. २०१८ नंतर हार्दिक पांड्याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यांचे संघातील स्थान कायम आहे. सिराजने तीन कसोटी सामन्यात १३ विकेट घेतल्या तर, शार्दुलने एकमेव कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करत ७ बळी घेतले. भारतीय संघ -सलामीवीर : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, मधली फळी : चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे आणि लोकेश राहुल, यष्टीरक्षक : ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, अष्टपैलू : हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, फिरकीपटू : आर. अश्विन, कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर, नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार, राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- हार्दिक, ईशांतचे पुनरागमन, अक्षर पटेल कसोटी संघात; इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची निवड
हार्दिक, ईशांतचे पुनरागमन, अक्षर पटेल कसोटी संघात; इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची निवड
पितृत्व रजेनंतर कर्णधार विराट कोहली याच्यासह वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू देण्यात आला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 2:53 AM