हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) मध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यांना १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह तालिकेत शेवटून पहिल्या क्रमांकासह स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. फ्रँचायझीने रोहित शर्माकडून नेतृत्व हार्दिककडे सोपवले, तेव्हा त्यांनी चाहत्यांचा रोष पत्करला होता. त्याचे पडसाद स्टेडियमवर उमटले आणि प्रेक्षकांनी अक्षरशः हार्दिकला हैराण करून सोडले. साहजिकच त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर आणि नेतृत्व कौशल्यावर झाला व त्याचा फटका संघाला बसला. आता आयपीएल २०२५ साठी फ्रँचायझी नक्कीच काहीतरी विचार करेल, अशी आशा आहे. पण, त्याआधीच BCCI च्या एका निर्णयाने IPL 2025 ची सुरुवात MI ला नव्या कर्णधारासह करावी लागणार आहे.
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
नाणेफेक जिंकल्यानंतर MIने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लोकेश राहुल (५५ धावा) आणि निकोलस पूरन ( ७५ धावा) यांच्या फटकेबाजीने संघाला ६ बाद २१४ धावांपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ६८ धावा) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस ( २०) यांची ८८ धावांची भागीदारी तुटल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी रांग लावली. नमन धीरच्या (२८ चेंडूत ६२* धावा, ४ चौकार आणि ५ षटकार) जबरदस्त खेळीमुळे मुंबईला आशा दाखवली होती. पण, त्यांची १८ धावेने हार झाली. मुंबईला ६ बाद १९६ धावाच करता आल्या. या संपूर्ण हंगामात हार्दिकने १४ सामन्यांत फक्त २१६ धावा केल्या, तर ११ विकेट्स घेतल्या.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल हार्दिकवर त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक पुढील हंगामातील पहिला सामना खेळू शकणार नाही, असे BCCIने शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केले. बीसीसीआयने सांगितले की, "मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला १७ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या IPL 2024 च्या सामन्यात स्लो ओव्हर रेट ठेवल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे," बीसीसीआयने म्हटले आहे.
हार्दिकला त्याच्या या वर्षातील तिसऱ्या स्लो ओव्हर रेट गुन्ह्यासाठी एका सामन्याच्या निलंबनासह दंड ठोठावण्यात आला. MI च्या कर्णधाराला ३० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे, तर इम्पॅक्ट प्लेअरसह MI खेळाडूंना १२ लाख किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या ५०% दंड ठोठावण्यात आला आहे.