Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या २५ दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्सपर्यंत पोहोचणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटर बनला आहे. हार्दिक अनेक वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटमधील सर्वात रोमांचक प्रतिभांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे अनेक चाहते आहेत. विशेष म्हणजे, हार्दिकने टेनिस दिग्गज राफेल नदाल, रॉजर फेडरर, मॅक्स वर्स्टॅपेन आणि एर्लिंग हॅलँड सारख्या काही जागतिक दर्जाच्या स्टार्सना मागे टाकले आहे.
याबद्दल आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त करताना हार्दिक पांड्या म्हणाला, माझ्या सर्व चाहत्यांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. माझा प्रत्येक चाहता माझ्यासाठी खास आहे आणि गेल्या अनेक वर्षांच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो.”त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो २५ मिलियन फॉलोअर्स पूर्ण केल्याच्या आनंदात २५ प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे.
त्याच्या व्यग्र वेळापत्रकामुले सोशल मीडियावरून चाहत्यांना मैदानावर आणि मैदानाबाहेरील त्याची माहिती मिळते. चे चाहत्यांशी भावनिक नाते अधिक घट्ट झाले आहे. वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी तो भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. सध्या तो क्रिकेटपासून दूर असला तरी लवकरच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. १७ मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात हार्दिक टीम इंडियाचे नेतृत्व करेल. रोहित शर्मा हा पहिला सामना खेळणार नाही, त्यामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करेल.