India vs South Africa : भारतीय संघाने अखेर तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील आव्हान जीवंत राखले. आफ्रिकेने सलग 2 सामने जिंकून मालिका विजयाच्या दिशेने पाऊल टाकले होते, परंतु भारतीय संघाने मंगळवारी सांघिक कामगिरीकरून विजय मिळवला. या सामन्यात इशान किशन व ऋतुराज गायकवाड यांनी अर्धशतकी खेळी केली, तर युजवेंद्र चहल व हर्षल पटेल यांनी उत्तम गोलंदाजी केली. पण, या सामन्यात हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) फार कमाल दाखवता आली नाही. या सामन्यातील सर्वात नशीबवान खेळाडू असल्याचे मत भारताचा माजी खेळाडू अमित मिश्रा ( Amit Mishra) याने अप्रत्यक्ष मांडले.
हार्दिक 1 धावेवर असताना डेव्हिड मिलरने त्याला जीवदान दिले. पांड्याने त्याचा फायदा उचलताना नाबाद 31 धावा केल्या आणि भारताने 5 बाद 179 धावा केल्या. माजी क्रिकेटपटू अमित मिश्राने ट्विट केले की,''कमी इंधन असलेल्या विमानतून आज हार्दिक पांड्याने प्रवास केला, इंजिनही बिघडलेलं होतं आणि वादळली आलं होतं, तरीही ते विमान सुखरूप लँड झाले.''
प्रत्युत्तरात आफ्रिकेचा निम्मा संघ ७१ धावांवर माघारी परतला. त्यांचे पुनरागमन करणे अवघडच झाले होते. हेनरीक क्लासेनचा ( २९) अडथळा दूर केला. चहलने ४ षटकांत २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने 4 विकेट्स घेतल्या. आफ्रिकेचा संपूर्ण संघ १३१ धावांत माघारी पाठवला. भारताने ४८ धावांनी सामना जिंकला.