Hardik Pandya मुळं बदललं बिहारच्या तरुणाचं नशीब; रातोरात बनला कोट्यधीश

सामना संपल्यानंतर त्याला एक कोटी रुपये जिंकण्याचा मेसेज आला. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर सौरव खूप आनंदी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 10:17 AM2022-09-22T10:17:10+5:302022-09-22T10:18:22+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya changed the fate of the youth of Bihar; Become a millionaire overnight | Hardik Pandya मुळं बदललं बिहारच्या तरुणाचं नशीब; रातोरात बनला कोट्यधीश

Hardik Pandya मुळं बदललं बिहारच्या तरुणाचं नशीब; रातोरात बनला कोट्यधीश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आरा - बिहारच्या आरा येथे राहणाऱ्या सौरभ कुमारचे नशीब अचानक बदलले आणि तो रातोरात करोडपती झाला. पण यामागचे कारण होतं क्रिकेटर हार्दिक पांड्या. विद्यार्थ्यांचे क्लासेस घेणारा सौरभ दोन वर्षांपासून ऑनलाइन क्रिकेट गेममध्ये नशीब आजमावत होता. नेहमीप्रमाणे त्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातही संघ बनवला, जो त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. सौरभच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. लोक जल्लोष करत होते त्याचबरोबर सौरभने या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले.

विजयानंतर टॅक्स कापून 70 लाख रुपये आले
विजयाच्या नोटिफिकेशननंतर सौरभने बँक खाते तपासले असता त्याच्या खात्यात ७० लाख रुपये आले होते. आरा जिल्ह्यातील चारपोखरी ब्लॉकमधील ठकुरी गावातील सौरभ कुमार अनेक दिवसांपासून ऑनलाइन क्रिकेट गेममध्ये टीम तयार करून पैसे गुंतवत होता.

हार्दिक पांड्याने नशीब उघडले
सौरभने सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी ऑनलाइन गेमिंग दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या T20 मालिकेतील सामन्यात, भारतीय संघाचे खेळाडू फलंदाज सूर्य कुमार यादव, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, गोलंदाज उमेश यादव आणि ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू यष्टीरक्षक एमएस स्मिथ, टी. डेव्हिड, सी ग्रीन, गोलंदाज जे हेझली ओड आणि नॅथन इलेस यांच्या चांगल्या प्रदर्शनावर नशीब आजमावलं होतं. पण हार्दिक पांड्याच्या शानदार फलंदाजीने त्याचे नशीबच पालटले. सामना संपल्यानंतर त्याला एक कोटी रुपये जिंकण्याचा मेसेज आला. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर सौरव खूप आनंदी आहे. त्यांच्या खात्यात सुमारे ७० लाख रुपये आले आहेत. सुमारे ३० लाख रुपये कर कपात करण्यात आला आहे. गावातील तरुणाने एक कोटी रुपये जिंकल्याची चर्चा संपूर्ण गावात व जिल्ह्यात सुरू आहे.

सौरभ बराच काळ प्रयत्न करत होता
सौरभने सांगितले की, २०१९ पासून तो ऑनलाइन गेमिंग अॅपवर एक टीम तयार करत आहे. यामध्ये त्याने अनेक वेळा हजारो रुपये जिंकले आणि हरले. सौरभ पदवीचे शिक्षण घेत आहे. अभ्यासासोबतच त्याला क्रिकेटमध्येही खूप रस आहे.

जय कंस ब्रह्म बाबा यांच्या नावाने युजर आयडी
चारपोखरी ब्लॉकच्या ठकुरी गावातील रहिवासी विंकटेश सिंह यांचा मुलगा सौरभ कुमार याने गेमिंग अॅपवर दुसऱ्या नावाने आपला यूजर आयडी बनवला आहे. सौरभने सांगितले की, त्याने जय कंस ब्रह्म बाबा या नावाने आपला युजर आयडी तयार केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामन्यानंतरचा लीडरबोर्ड गेमिंग अॅपवर पाहिला जाऊ शकतो, ज्यामध्ये सौरभ जय कंस ब्रह्म बाबा पहिल्या स्थानी आहे आणि १ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम लिहिली आहे.
 

Web Title: Hardik Pandya changed the fate of the youth of Bihar; Become a millionaire overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.