केपटाऊन - भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं आपल्या खेळाच्या बळावर क्रिकेट विश्वात अल्पावधीतच आपलं नाव केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या कसोटीमध्ये हार्दिकनं निर्णायक 93 धावांची खेळी केली होती. तसेच दुसऱ्या डावात पांड्याने 27 धावा देत 2 बळी घेत आफ्रिकेचा डाव 130 धावांमध्ये गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. पांड्याच्या या शानदार खेळावर दक्षिण आफ्रिेकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लॉन्स क्लूजनर फिदा झाला आहे. पांड्या भविष्यामध्ये जगातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू बनू शकतो असे भाकीत क्लूजनर यांनी केले आहे.
पहिल्या डावात हार्दिक पांड्याने जबरदस्त खेळी करत प्रभावित केले आहे. पांड्याने दबावामध्ये फटकेबाजी करत आफ्रिकेच्या संघावर दबाव निर्माण केला. भविष्यामध्ये पांड्या भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करू शकतो, असे क्लूजनर म्हणाले. पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या नवखा आहे. आपल्या खेळीत सातत्या राखल्यास तो जगातील सर्वोतम अष्टपैलू बनू शकतो.
अष्टपैलू हार्दिक पंड्या हा भारतासाठी एखाद्या संपत्तीसारखा मौल्यवान आहे, अशी स्तुतीसुमनंही लान्स क्लुजनरने उधळली आहेत.
पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 93 धावा केल्या. इतकंच नाही तर आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात 27 धावांत 2 विकेटही घेतल्या. पंड्याच्या या कामगिरीचं क्लुजनरने कौतुक केलं. पहिल्या डावात पंड्याची फलंदाजी जबरदस्त होती. त्याने भारताला दबावातून बाहेर काढलंच, शिवाय आफ्रिकेला दबावात टाकलं. सध्या तर तो शिकतोय. त्याच्या गोलंदाजीला आणखी धार चढेल, तेव्हा तो उत्तम अष्टपैलू होईल, असं क्लुजनर म्हणाला.
आफ्रिकेतील खेळपट्ट्यांचा अंदाज घेण्यासाठी भारताने एकतरी सराव सामना खेळायला हवा होता, असंही क्लुजनर म्हणाला. आता पहिल्या सामन्यातील पराभवातून भारताने धडा घ्यावा, तो घेईल. पहिल्या सामन्यात पंड्याने धावा केल्या नसत्या, तर भारताची अवस्था आणखी बिकट झाली असती. त्यामुळे भारताने वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यासाठी तयार राहावं, असा सल्ला क्लुजनरने दिला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 13 जानेवारी रोजी होणार आहे.
Web Title: Hardik Pandya could develop into a fantastic asset Says Lance Klusener
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.