...तर हार्दिक पांड्याला वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या अंतिम ११मध्ये स्थान मिळणार नाही; निवड समिती सदस्याचा दावा

बीसीसीआयनं लंडन दौऱ्यासाठी निवडलेल्या २० सदस्यीय संघात हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) स्थान न मिळाल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 05:27 PM2021-05-14T17:27:11+5:302021-05-14T17:28:49+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya doesn't fit into playing XI even in ODIs and T20s if he can't bowl: Sarandeep Singh | ...तर हार्दिक पांड्याला वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या अंतिम ११मध्ये स्थान मिळणार नाही; निवड समिती सदस्याचा दावा

...तर हार्दिक पांड्याला वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या अंतिम ११मध्ये स्थान मिळणार नाही; निवड समिती सदस्याचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बीसीसीआयनं लंडन दौऱ्यासाठी निवडलेल्या २० सदस्यीय संघात हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) स्थान न मिळाल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता त्याचे वन डे व ट्वेंटी-२० संघातील अंतिम ११मधील स्थानही धोक्यात येण्याची शक्यता आहे. भारताच्या निवड समितीचे माजी सदस्य सरणदीप सिंग ( Former India selector Sarandeep Singh ) यांनी हार्दिक पांड्याची निवड न झाल्याचे समर्थन केलं. जर तो गोलंदाजी करू शकत नसेल, तर वन डे व ट्वेंटी-२०साठीच्या अंतिम ११मध्येही तो फिट बसत नाही, असा दावाही त्यांनी केला. विराट कोहलीच्या यशावर जळतो इंग्लंडचा माजी कर्णधार; केन विलियम्सनचं नाव पुढे करून केला मोठा दावा!

२०१९मध्ये पाठीवरील शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पांड्या गोलंदाजी करताना दिसला नाही. त्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात स्थान मिळाले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक मालिका विजयानंतर सरणदीप यांचा निवड समिती सदस्याचा कार्यकाळ संपला. ''हार्दिक पांड्याच्या नावाचा विचार न होण्याचा निर्णय समजू शकतो. सर्जरी नंतर तो गोलंदाजी करत नाहीय. पण, त्यानं वन डेत १० षटकं आणि ट्वेंटी-२०त ४ षटकं टाकायला हवीत. पण, तो तसं करत नसेल, तर फक्त फलंदाज म्हणून तो मर्यादित षटकांच्या संघात खेळू शकत नाही,''असे ते म्हणाले. विराट-अनुष्का यांनी कोरोना लढ्यासाठी जमा केला रिकॉर्डतोड निधी; मानले सर्वांचे आभार!

''हार्दिक पांड्या गोलंदाजी करू शकत नसल्यानं संघाचे संतुलन बिघडतेय. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त गोलंदाजासह खेळावे लागेल आणि त्यामुळे सूर्यकुमार यादवसारख्या फलंदाजाची संधी हिरावली जाऊ शकते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाविरुद्धच्या वन डे मालिकेत तुम्ही पाच गोलंदाजासह खेळू शकत नाही. अशावेळी संघानं वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा या ऑल राऊंडर्सना पाचारण करायला हवं. शार्दूल ठाकूर हाही अष्टपैलू कामगिरी करू शकतो आणि त्यानं ते सिद्ध केलंय. हार्दिक गोलंदाजी करू शकत नसेल, तर हे सर्व ऑल राऊंडरची कामगिरी चोख पार पाडू शकतात,'' असेही सरणदीप सिंग म्हणाले. इरफान-युसूफ पठाण यांना सलाम; कोरोना संकटात ९०,००० कुटुंबीयांचे भरले पोट अन् अजूनही मदतकार्य सुरूच

पृथ्वी शॉ याची निवड न होण्यावरून सरणदीप यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,''वीरेंद्र सेहवागनं टीम इंडियासाठी जे केलं, ते करण्याची धमक पृथ्वीत आहे. त्याला इतक्या सहज तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. त्यानं त्याच्या तांत्रिक चुकांत सुधारणा केली. आयपीएलमध्ये त्यानं कसा खेळ केला ते पाहा. पृथ्वी, शुबमन गिल या प्रतिभावान खेळाडूंना पाठींबा द्यायला हवा.''  

Web Title: Hardik Pandya doesn't fit into playing XI even in ODIs and T20s if he can't bowl: Sarandeep Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.