आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघात निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूच्या आयपीएल २०२१मधील कामगिरीवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. सूर्यकुमार यादव, इशान किशन यांचे अपयश बीसीसीआयची डोकेदुखी वाढवणारे ठरत आहे. त्यात प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याचा फॉर्मही चिंतेचा विषय ठरतोय. त्यात हार्दिक गोलंदाजी करत नसल्यानं त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर मुंबई इडंडियन्सच्या मॅनेजमेंट टीममधील सदस्य झहीर खान, प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी मत मांडून झाली. पण, आज स्वतः हार्दिकनं त्यावर मत मांडले,' आएगा जल्दी, कोशीश पूरी है!', असे विधान हार्दिकनं केलं.
तो म्हणाला,''धावा होणे महत्त्वाचे आहे आणि विशेष करून जेव्हा तुमचा संघ जिंकतो. शिवाय माझा आत्मविश्वास उंचावण्यासाठीही ते गरजेचे आहे, परंतु त्या धावा संघासाठीही अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. शाहजाह येथे पहिलाच सामना खेळतोय आणि खेळपट्टीवर जेवढ्या लवकरत स्थिरस्थावर होता येईल, हा प्रयत्न असेल. तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. हा सामना आमच्यासाठी करो वा मरो असा आहे, परंतु आम्ही त्याच्यासाठी सज्ज आहोत. गोलंदाजीही लवकर करीन, मेहनत तर घेतोय.''
हार्दिकला गोलंदाजीस भाग पाडल्यास त्रास होऊ शकतो - माहेला जयवर्धने
आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या याला गोलंदाजी करण्यास बाध्य करता येणार नाही. असे झाल्यास त्याला त्रास होऊ शकतो, अशी भीती मुंबई इंडियन्सचे कोच माहेला जयवर्धने यांनी शुक्रवारी व्यक्त केली. हार्दिककडून गोलंदाजी करून घेण्याची घाई नाही. सध्या गोलंदाजी केल्यास आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मधील सामन्यात त्याचे विपरीत परिणाम जाणवू शकतात.
जयवर्धने म्हणाले,‘हार्दिकसंदर्भात मुंबई संघ भारतीय संघ व्यवस्थापनाच्या सतत संपर्कात आहे. हार्दिकने दीर्घकाळापासून गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळेच हार्दिकबाबत सर्वश्रेष्ठ निर्णय घेण्याच्या स्थितीत आहोत. तो आयपीएल सामन्यात गोलंदाजी करू शकतो का, हे प्रत्येक दिवसाच्या आधारे ठरविले जाईल. सध्यातरी त्याला गोलंदाजी करण्यास बाध्य केल्यास जुनी जखम पुन्हा उचल खावू शकेल.’
Web Title: Hardik Pandya during the pre-match interview has said that he will bowl soon and he is putting a lot of effort in it
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.