Join us

कदाचित तुम्हाला आता माहिती नसेल, पण... नताशाच्या मनात नेमकं चाललंय काय?

ती गोष्ट हार्दिक पांड्याशी संबंधित आहे की, तिला आणखी काही म्हणायचं आहे, हा एक वेगळाच प्रश्न तिने नव्या पोस्टच्या माध्यमातून निर्माण केल्याचे दिसते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 14:17 IST

Open in App

Hardik Pandya Ex Wife Natasa Stankovic Instagram post : हार्दिक पांड्याची एक्स वाइफ नताशा स्टँकोव्हिच ही तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.  सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या नताशानं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक व्हिडिओ क्लिप शेअर केलीये. या व्हिडिओ पोस्टला तिने जे कॅप्शन दिलं आहे, त्यात काही तरी दडलंय असं दिसतंय. आता ती गोष्ट हार्दिक पांड्याशी संबंधित आहे की, तिला आणखी काही म्हणायचं आहे, हा एक वेगळाच प्रश्न तिने नव्या पोस्टच्या माध्यमातून निर्माण केल्याचे दिसते. 

काय आहे नताशाची ती पोस्ट?

नताशा ही सोशल मीडियावरील एक स्टारच आहे. ती आपल्या वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून सातत्याने चर्चेत असते. तिची पोस्ट पडली की, तो चर्चेचा एक वेगळा विषयही ठरतो. आता तिने रहस्यमयी पोस्टसह सर्वांचे लक्षवेधून घेतलं आहे. व्हाइट कलरमधील हार्ट आणि बर्ड इमोजीसह तिने लिहिलंय की, कदाचित तुम्हाला आता माहिती नसेल, पण नंतर तुम्हाला ते समजेल. या रहस्यमयी ओळींसह तिने John 13:7 असा उल्लेखही केला आहे. तिच्या मनात नेमकं काय ते मात्र अस्पष्टच आहे.  

नताशा-हार्दिकची पुन्हा एकत्र झलक दिसणार?

हार्दिक पांड्यासोबतचा संसार मोडल्यावर नताशा आपल्या माहेरी गेली होती. सर्बियातून ती काही दिवसांपूर्वीच पुन्हा मुंबईमध्ये परतली आहे. हार्दिक आणि नताशा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुलगा अगस्त्या याचा मिळून सांभाळ करण्याची घोषणाही केली होती. सध्या अगस्त्या ना हार्दिक पांड्याजवळ आहे ना नताशाजवळ. कारण सध्या तो चुलता-चुलती क्रुणाल पांड्या आणि पंखुडी यांच्यासोबत असल्याचे दिसते. अगस्त्यामुळं हार्दिक पांड्या आणि नताशा यांची एकत्र झलक पाहायला मिळणार का? हा देखील विषय चर्चेत आहे. 

नताशाच्या आयुष्यात कोणी आलंय?

या पोस्टचा  हार्दिक पांड्याशी काही संबंध असण्यापेक्षा तिच्या आयुष्यात जॉन नावाचं कोणी आलंय का? असा प्रश्नही निर्माण होतो.  कारण "जॉन तेरा सात" असाही एक अर्थ या पोस्टमध्ये दडल्याचे दिसून येते. पण यात नेमकं काय दडलंय त्याचं खरं उत्तर फक्त अन् फक्त नताशाच देऊ शकते. कदाचित त्यासाठी तिच्या पुढच्या पोस्टची चाहत्यांना प्रतिक्षा करावी लागेल.   

 

टॅग्स :ऑफ द फिल्डहार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिच