Fans trolls Hardik Pandya for not giving strike to Arshdeep Singh : दक्षिण आफ्रिकेतील गकेबरहाच्या सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. वरुण चक्रवर्तीच्या फिरकीत दक्षिण आफ्रिकेचा संघ गडबडला होता. पण स्टब्सची आश्वासक खेळी अन् त्याने तळाच्या फलंदाजीतील कोएत्झीवर दाखवलेला विश्वास यामुळे दक्षिण आफ्रिकेनं हातून निसटत चाललेवला सामना जिंकून दाखवला. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात जो सीन दिसला त्याच्या उलट गोष्ट भारतीय संघाच्या बॅटिंग वेळी घडली. हार्दिक पांड्याने रुबाब दाखवत अर्शदीपला स्टाईक देणं टाळलं. त्यावरुन आता सोशल मीडियावर त्याला ट्रोलचा सामनाही करावा लागत आहे.
आता नॉन स्ट्राइकवर एन्जॉय कर
हार्दिक पांड्याने भारताकडून सर्वोच्च धावा केल्या. पण त्याची खेळी खूपच संथ होती. त्याने ४५ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३९ धावा काढल्या. १९ व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग क्रिजवर होते. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेतल्यावर आता नॉन स्ट्राइकला आनंद घे, असे म्हणत हार्दिक पांड्या स्ट्राइकवर गेला. पण सलग १० चेंडू खेळूनही पांड्याला आपला स्वॅग काही दाखवता आला नाही. शेवटच्या १० चेंडूत फक्त ६ धावा आल्या.
हार्दिकचा तोरा चाहत्यांना खटकला
भारतीय संघाच्या बॅटिंग वेळी जे काही घडलं ते क्रिकेट चाहत्यांना खटकणारे होते. यामागचं आणखी एक कारण अर्शदीप सिंग याने हा सर्व प्रकार घडण्याआधी एक उत्तुंग षटकार मारून आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश केला होता. त्यामुळे जे घडलं ते हार्दिकनं रुबाब झाडण्याच्या नादात टीम इंडियाला अडचणी आणण्यास कारणीभूत ठरलं.
सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया
हार्दिक पांड्याचा हा अंदाज चाहत्यांनाचांगलाच खटकला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते हार्दिक पांड्याला ट्रोल करताना पाहायला मिळत आहे. अर्शदीपला नॉन स्ट्राइकला एन्जॉय कर म्हणणाऱ्या हार्दिक पांड्याच्या बॅटला ३ चेंडू लागलेच नाहीत, असे म्हणथ काहींनी पांड्याची शाळा घेतली आहे.
हार्दिकला धाव निघत नव्हती त्यावेळी त्याने अर्शदीपला स्ट्राइक द्यायला पाहिजे होते. कदाचित त्याच्या भात्यातून आणखी फटकेबाजी पाहायला मिळाली असती, अशा काही प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटताना दिसते. हार्दिक पांड्या हा एखाद्या ड्रामा क्वीनसारखा आहे, अशा शब्दांतही एकाने नेटकऱ्याने हार्दिकच्या त्या वागण्यावर संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळते.