Hardik Pandya Abhinav Manohar, IPL 2022 SRH vs GT Live: सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने केलेलं संयमी अर्धशतक आणि अभिनव मनोहरची २१ चेंडूत ३५ धावांची फटकेबाजी याच्या बळावर गुजरात टायटन्सने १६२ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधारपदाची जबाबदारी ओळखत शेवटपर्यंत खेळपट्टी सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्याने हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. तर तब्बल तीन वेळा झेल सुटल्याने जीवदान मिळालेल्या अभिनव मनोहरने दमदार कामगिरी केली. हैदराबादच्या टी नटराजनने २ बळी घेत डावात सर्वोत्तम गोलंदाजी केली.
केन विल्यमसनने टॉस जिंकून गुजरातला फलंदाजी दिली. गुजरातचे सलामीवीर शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड स्वस्तात बाद झाले. गिल ७ धावांवर आणि वेड १७ धावांवर माघारी परतला. नवखा साई सुदर्शनदेखील ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने डेव्हिड मिलरच्या साथीने डाव पुढे नेला. मिलर १२ धावा काढून बाद झाला. पण हार्दिकने एक बाजू लावून धरत कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ४२ चेंडूत संयमी नाबाद ५० धावांची खेळी केली. अभिनव मनोहरने फटकेबाजी करत शेवटच्या टप्प्यात धावफलकाला गती दिली. त्याला तीन वेळा जीवदान मिळाल्यानंतर अखेर २१ चेंडूत ३५ धावा काढून तो बाद झाला. नटराजनने ३४ धावांत २ भुवनेश्वरने ३७ धावांत २ बळी टिपले.
गुजरात टायटन्स संघ: मॅथ्यू वेड (किपर), शुभमन गिल, साई एस, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे
सनरायझर्स हैदराबाद संघ: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (डब्ल्यू), एडन मार्कराम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन