भारतीय क्रिकेट विश्वात विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्यानंतर सध्या चर्चा सुरू आहे ती हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच या कपलची... 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकनं दुबईत बॉलिवूड अभिनेत्रीसोबत साखरपुडा उरकला. हार्दिकच्या या सप्राईजची त्याच्या कुटुंबीयांनाही माहिती नव्हती. पण, त्यांनी हे नातं स्वीकारलं. लॉकडाऊमुळे नताशा सध्या हार्दिक पांड्याच्या घरीच आहे. हार्दिक-नताशा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असतात. पण, सध्या सोशल मीडियावर हार्दिकच्या होणाऱ्या सासऱ्यांचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.
सर्बियन नागरिक असलेल्या नताशाने 'सत्याग्रह'सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. नच बलिये या कार्यक्रमात ती एक्स बॉयफ्रेंड एल. गोनीसोबत सहभाग घेतला होता. त्यानंतर तिचं आणि हार्दिकचं प्रेम प्रकरण सुरू झाले. हार्दिक-नताशा गेली अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. त्यांना अनेकवेळा एकत्रही पाहिले गेले. दोन महिन्यांपूर्वी हार्दिकनं मुंबईत झालेल्या एका पार्टीमध्ये भाऊ कृणालची नताशाशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर त्यांच्या प्रेमाचं अंकुर अजून फुललं... नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिकनं नताशासोबत साखरपुडा करून प्रेमाची कबुली दिली. हार्दिकनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत दोघंही एकमेकांना किस करताना दिसले होते.
भारतीय क्रिकेटपटूंमध्ये हार्दिक सर्वाधिक स्टायलिस्ट म्हणून ओळखला जातो. पण, त्याच्या सासऱ्यांचा हा व्हिडीओ पाहिलात तर ते हार्दिकपेक्षा अधिक कूल असल्याचं नक्की जाणवेल. नताशानं गतवर्षी वडिलांसोबत एक व्हिडीओ शेअर केला होता, तो सध्या व्हायरल होत आहे. यात तिनं वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
... तर पाकिस्तानकडे वीरेंद्र सेहवागपेक्षाही स्फोटक फलंदाज असता; शोएब अख्तरचा अजब दावा
कर्तव्य बजावताना हात गमावलेल्या 'धाडसी' पोलिसाला Yuvraj Singh चा Salute!
राहुल द्रविडमुळे एक त्रिशतक हुकलं; Virender Sehwagचा गंभीर आरोप