Hardik Pandya Yo-Yo Test : हार्दिक पांड्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात खेळणार की नाही याचा अखेर फैसला झाला. एक महिने टाळाटाळ केल्यानंतर हार्दिक पांड्या अखेर BCCI ने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) भरवलेल्या फिटनेस कॅम्पमध्ये दाखल झाला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर हार्दिक क्रिकेटच्या मैदानापासून दूरच आहे. त्याला रणजी करंडक स्पर्धा खेळण्याचा सल्लाही दिला होता, पण त्याने विश्रांती घेण्याचे ठरवले. त्यानंतर तो अहमदाबाद येथेच तंदुरुस्तीवर मेहनत घेत होता आणि BCCIच्या कॅम्पमध्ये जाण्यास टाळाटाळ करत होता. निवड समितीचे कान टोचल्यावर तो NCAत पोहोचला अन् त्याने फिटनेस टेस्ट दिली.
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक पांड्या जोपर्यंत तंदुरूस्ती चाचणीत उतीर्ण ठरत नाही, तोपर्यंत त्याला आयपीएल २०२२ खेळण्याची परवानगी देणार नसल्याची भूमिका बीसीसीआयने घेतली होती. त्यामुळे या फिटनेस टेस्टकडे साऱ्यांचे लक्ष होते. ''NCAचे फिजिओ व व्ही व्ही एस लक्ष्मण हे फिटनेस टेस्ट प्रोग्राम तयार करतील. पण, निवड समितीने हे स्पष्ट केले आहे की त्याला किमान १० षटकं फेकावी लागतील आणि Yo-Yo टेस्ट पास करावी लागेल. त्याला विशेष सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे हार्दिकला Yo-Yo टेस्टमध्ये १६.५ पेक्षा अधिक गुण मिळवावे लागतील,''असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.
हार्दिक पांड्याने याआधी Yo Yo टेस्टमध्ये १८ पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत, त्यामुळे तो यंदाही पास होईल असा अंदाज होता. तो खरा ठरला. हार्दिक पांड्याने फिटनेस टेस्ट पास केली असून तो आयपीएल २०२२मध्येगुजरात टायटन्सचे ( Gujarat Titans) नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो गोलंदाजी करतानाही दिसणार आहे. ( Hardik Pandya has passed the Yo-Yo Test and he's set to bowl in IPL 2022.) हार्दिकने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने ९२ सामन्यांत १४७६ धावा आणि ४२ विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याने १३५kmph च्या वेगाने गोलंदाजी केली आणि Yo-Yo Test मध्ये १७ पेक्षा अधिक मार्क मिळवले.
गुजरात टायटन्स: शुभमन गील, हार्दिक पांड्या, राशिद खान, , मोहम्मद शमी ( ६.२५ कोटी), लॉकी फर्ग्युसन ( १० कोटी), अभिनव सदारंगानी ( २.६० कोटी), राहुल तेवतिया ( ९ कोटी), नूर अहमद ( ३० लाख), साई किशोर ( ३ कोटी), डॉमनिक ड्रेक्स ( १.१० कोटी), विजय शंकर ( १.४० कोटी), जयंत यादव ( १.७० कोटी), दर्शन नलकांडे ( २० लाख), यश दयाल ( ३.२० कोटी), डेव्हिड मिलर ( ३ कोटी), वृद्धीमान सहा ( १.९० कोटी), मॅथ्यू वेड ( २.४० कोटी), अल्झारी जोसेफ ( २.४० कोटी), प्रदीप सांगवान ( २० लाख) , वरुण अॅरोन ( ५० लाख), बी साई सुदर्शन ( २० लाख)
See full Time Table of Gujarat Titans
- २८ मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- २ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ८ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ११ एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १४ एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्घ गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १७ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- २३ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- २७ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ३० एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- ३ मे - गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, डी वाय स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ६ मे - गुजरात टायट्सन विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १० मे - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १५ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- १९ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून